Of 'Ranbhaji Mahotsava' Benefit farmers in Nava
Of 'Ranbhaji Mahotsava' Benefit farmers in Nava 
मुख्य बातम्या

‘रानभाजी महोत्सवा’चा नाव्हातील शेतकऱ्यांना फायदा

टीम अॅग्रोवन

नांदेड : नाव्हा (ता. हदगाव) येथील शेतकऱ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त नांदेड येथे आयोजित रानभाजी महोत्सवात एक लाख रुपयांची कमाई केली. ''पिकेल ते विकेल''या संकल्पनेतून हा महोत्सव राबविण्यात आला. नाव्हातील ३० शेतकऱ्यांनी विविध विक्री केंद्रांतून रानभाज्यांची विक्री केली.  

किनवट उपविभागीय कृषी अधिकारी दिगंबर तपासकर, हदगाव तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांचे मार्गदर्शन लाभले. कृषी सहायक अशोक खरात यांच्या पाठपुराव्यामुळे नाव्हाच्या शेतकऱ्यांनी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला. या गावचा परिसर हा जंगल बहुल व दुर्गम आहे. येथील शेतकरी मोठ्या संख्येने आदिवासी समुदायातील आहेत. 

रानभाजी महोत्सवात नाव्हा येथील शेतकऱ्यांची सफेद मुसळी, कर्टूले, नाय, गुळवेल, सुरजकंद, वाघाटे, अळू, पाथरी, तांदूळगा, हडसन, उंबरदोडी. फांज, घोळ आदी रानभाज्यांच्या खरेदीला उपस्थितांनी पसंती दिली.  विविध आजारांवर प्रभावी असणाऱ्या रानभाज्या नाव्हा परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतात.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, कृषी उपसंचालिका माधुरी सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी रवीकुमार सुखदेव आदींनी रानभाज्यांची खरेदी केली. या वेळी आदिवासी दिन औचित्याने नाव्हा येथील महिला शेतकरी सत्वशीला नाव्हेकर यांचा प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आला. 

नाव्हा परिसरातील डोंगराळ भागात विविध प्रकारच्या रानभाज्या आहेत. त्या बीन खर्चिक व मोठी कमाई मिळवून देतात. जंगलाचे नैसर्गिक वातावरण लाभले आहे. त्यामुळे रानभाज्या विपुल प्रमाणात येथे आहेत. रानभाजी महोत्सवात नाव्हातील शेतकऱ्यांनी एकाच दिवशी एक लाख रुपयांची कमाई केली.   - संजय गोदगिरे, नाव्हा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT