raisin
raisin  
मुख्य बातम्या

पावसामुळे सात टन मनुका भिजून नुकसान

टीम अॅग्रोवन

झरे, जि. सांगली : विभुतवाडी (ता.आटपाडी) येथील दादा नाना खर्जे यांची सात एकर द्राक्ष बाग आहे. दरवर्षी ते मनुका करतात. यंदा त्यांनी सात टन मनुका तयार केला. मात्र, बुधवारी (ता.१८) रात्री पाऊस आला आणि त्यात शेडवरती मनुका सुकण्यासाठी ठेवलेला मनुका भिजला. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, या नुकसानीचा पंचनामा करण्यास तलाठ्याने नकार दिला आहे. पावसामुळे सात टन मनुका भिजला असून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. भिजलेल्या मनुक्याचे पंचनामे करण्यासाठी शेतकरी दादा खर्जे यांनी गावकामगार तलाठी संतोष पवार यांना संपर्क साधला. मात्र, ‘‘आम्हाला पंचनामे करण्याचे आदेश नाहीत त्यामुळे आम्ही पंचनामा करू शकत नाही,’’ असे तलाठी यांनी सांगितले.  ‘‘दहा ते बारा वर्षे दुष्काळाच्या झळा सहन करून टॅंकरने पाणी घालून द्राक्षबागा कशाबशा जगवल्या. मागील काही महिन्यांपूर्वी अवकाळीचा पाऊस पडल्याने तलाव विहिरी तुडुंब झाल्या त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला. बऱ्यापैकी द्राक्षे आली. निदान घातलेला खर्च तरी निघेल अशी अपेक्षा होती. परंतु, रात्री अचानक विजेचा गडगडाट, वारा, पाऊस यांमुळे मनुका भिजला आणि वर्षभर केलेलं कष्ट वाया गेले. तरी त्याची नुकसानभरपाई मिळावी. द्राक्षबागा लावण्यासाठी बँकेचे कर्ज घेतलेला आहे. कसंतरी व्याज भरून फिरवाफिरवी करीत आहे. यावर्षी वाटलं की काही चार पैसे मिळतील परंतु अचानक आलेल्या पावसामुळे मनुका काळसर पडून खराब झाले आहेत तरी शासनाने याचा विचार करावा,’’ अशी मागणी शेतकरी खर्जे यांनी केली. प्रतिक्रिया दुष्काळातून कसातरी बाहेर पडलो आणि रात्रीच्या पावसाने मनुका भिजून काळे पडले त्यामुळे त्याला बाजारपेठेत दर मिळणार नाही शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी. गाव कामगार तलाठी यांना फोन वरून मनुका भिजलेली याची माहिती दिली, परंतु तलाठी म्हणाले आम्हाला पंचनामे करण्यासाठी आदेश नाही. तर मग आम्ही दाद कोणाकडे मागायची.  - दादा खर्जे, मनुका उत्पादक, विभुतवाडी, ता. आटपाडी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT