raisin
raisin  
मुख्य बातम्या

सांगलीत बेदाणा सौद्यास हिरवा कंदील

टीम अॅग्रोवन

सांगली: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाइन बेदाणा सौद्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे प्रतिसादच नव्हता. त्यामुळे तासगावच्या धर्तीवर सांगलीत पूर्वीप्रमाणे खुले बेदाणा सौदे व्हावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. श्री. पाटील यांनी तत्काळ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याशी चर्चा करून सौदे घेण्यास हिरवा कंदील दिला. त्यामुळे बुधवार (ता. १०) पासून बेदाणा सौदे सुरू होतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीमधील बेदाणा सौदे घेण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ऑनलाइन बेदाणा सौदे घेण्याचा पर्याय सुचवला होता. त्यानुसार काही दिवस ऑनलाइन बेदाणा सौदे काढण्यात आले; परंतु दरामध्ये शेतकऱ्यांना फटका बसू लागला. त्यामुळे हे सौदे बंद झाले. काहींनी थेट कोल्ड स्टोअरेजमध्ये बेदाणा सौदे काढण्यास सुरवात केली; तर तासगाव येथे खुले बेदाणा सौदे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत होऊ लागले. तासगावात सौदे होतात, तर सांगलीत का नाही? असा प्रश्‍न शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना पडला होता. त्यामुळे सांगलीतही सुरक्षितपणे बेदाणा सुरू करावेत, अशी मागणी होत होती. मंगळवारी माजी महापौर तथा अडत व्यापारी सुरेश पाटील, बेदाणा अडत संघटना प्रमुख प्रशांत ऊर्फ पप्पू मजलेकर, शरद पाटील, मुजीर जांभळीकर, रवी हजारे, सचिन चौगुले यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना भेटून बेदाणा सौदे सुरू करण्याची मागणी केली. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांनीही पालकमंत्री पाटील यांच्याशी चर्चा केली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बेदाणा सौदे घेण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्याशी चर्चा केली. चर्चेतून बेदाणा सौदे घेण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे आता बुधवारपासून सांगलीत नियमित बेदाणा सौदे सुरू होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Agriculture Success Story : नैसर्गिक उमाळ्यावर फुलली शेती, बहरले पर्यटन

Horticulture : ‘कोठली’ला मिळाला बागायती चेहरा

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

SCROLL FOR NEXT