हवामान
हवामान 
मुख्य बातम्या

राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

गणेश कोरे

पुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व मराठवाड्यात रविवारी (ता. १५) तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल. तर साेमवार (ता. १६) ते बुधवार (ता.१७) काेकण गाेव्यासह संपूर्ण राज्यात हवामान काेरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शनिवारपर्यंतच्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नाेंद पुण्यात झाली.

शनिवारी राज्यात मध्य महाराष्ट्र, काेकणासह गाेव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. तर काेकण गाेव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व विदर्भात तुरलक ठिकाणी पाऊस झाल्याची नाेंद हवामान विभागाकडे झाली आहे. शनिवार (ता.१४) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत झालेला पाऊस ः (मिलिमीटरमध्ये)  काेकण गाेवा ः वैभववाडी ९०, कणकवली ७०, कर्जत ६०, वेंगुर्ला, संगमेश्‍वर, खालापूर, माणगाव प्रत्येकी ५०, दाभाेलिम, सांगे प्रत्येकी ४०, कुडाळ, चिपळूण, भिरा प्रत्येकी ३०.  मध्य महाराष्ट्र ः पुणे १००, हातकणंगले ८०, शिराेळ ७०, पंढरपूर, कर्जत ६०, खंडाळा, बावडा, बार्शी, करमाळा, वडगाव मावळ, पारनेर, चाळीसगाव प्रत्येकी ५०, इगतपुरी ४०, तासगाव, शिराळा, गगनबावडा, गारगाेटी, येवला, जामखेड प्रत्येकी ३०. मराठवाडा ः खुलताबाद ७०, परांडा ६०, आष्टी ४०, तुळजापूर, लाेहारा, भूम, वाशी प्रत्येकी ३०.  विदर्भ ः माेहाडी ५०, वाशीम २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT