मराठवाड्यातील २५७ मंडळांमध्ये पाऊस
मराठवाड्यातील २५७ मंडळांमध्ये पाऊस 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील २५७ मंडळांमध्ये कमी-अधिक पाऊस

टीम अॅग्रोवन

नांदेड, औरंगाबाद  ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २५७ मंडळांमध्ये रविवारी (ता. ४) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला. तर औरंगाबाद, जालना, बीड तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील सर्व ८० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. किनवट तालुक्यातील किनवट मंडळामध्ये ८३ मिलिमीटर, बोधडी मंडळात ९५ मिलिमीटर, माहूर तालुक्यातील वानोळा मंडळामध्ये १९१ मिलिमीटर, हदगांव तालुक्यातील तळणी मंडळात ९० मिलिमीटर पाऊस झाला. किनवट तालुक्यात ओढ्या नाल्याचे पाणी शेतातमध्ये शिरल्यामुळे पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले. किनवट तालुक्यात ओढ्याच्या पुरामध्ये एक शेतकरी वाहून गेल्याचे वृत्त आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ तालुक्यांतील ३० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आले. सांडस गावाजवळील पूल तुटल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. औढा नागनाथ ते हिंगोली रस्त्यावरील नवीन पुलाच्या वळण रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. परभणी जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील २८ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. पूर्णा तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी औरंगाबाद, सिल्लोड, वैजापूर, कन्नड तालुक्यातील १४ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी बदनापूर, जाफ्राबाद तालुक्यातील ३ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. 

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी ५० मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, औसा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३४ मंडळामध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहरा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी बीड, पाटोदा, आष्टी, अंबाजोगाई, केज, परळी या तालुक्यातील १८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)  नांदेड जिल्हा ः नांदेड ३२, नांदेड ग्रामीण २९, वजीराबाद ३१, वसरणी ३२, तरोडा ३१, लिंबगांव २७, तुप्पा २५, विष्णुपुरी २४, अर्धापूर २६, मालेगांव ३५, दाभड ३३, मुदखेड १८, मुगट २२, बारड २२, हदगांव ५९, तामसा ३३, मनाठा ६०, पिंपरखेड ५८, आष्टी ४५, निवघा ४५, तळणी ९०, माहूर ६४, वाई १७, वानोळा १९१, सिंदखेड १९, किनवट ८३, इस्लापूर ५४, मांडवी २१, बोधडी ९५, दहेली ४५, जलधारा ६०, शिवणी ५२, हिमायतनगर ५९, सरसम ४६, जवळगांव ४३, भोकर १९, किनी २६, मोघाली २०, मातुल १५, उमरी १४, सिंदी ११, गोलेगांव १८, धर्माबाद १६, जारिकोट ३१, करखेली १७, नायगांव २२, नरसी २०, मांजरम १८, बरबडा १६, कुंटूर १९, बिलोली १८, कुंडलवाडी १०, सगरोळी १२, आदमपूर २०, लोहगांव २२, देगलूर १०, खानापूर ७, शहापूर १०, मरखेल १२, मालेगांव १४, हानेगांव ९, मुखेड १७,जांब २४, येवती १२, जाहूर २७, चांडोळा २२, मुक्रमाबाद १८, कंधार २०, फुलवल २०, उस्मानननगर १७, बारुळ १९, पेठवडज २७, कुरुला २५, लोहा १८, माळाकोळी १६, कलंबर ३२, शेवडी २३, सोनखेड १६, कापसी २१.

परभणी जिल्हा ः परभणी ५, गंगाखेड ५, राणीसावरगांव १०, पालम १८, बनवस १६, पूर्णा २५, ताडकळस १९, चुडावा ३७, लिमला ६, कात्नेश्वर १३.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २८, खंबाळा ३०, माळहिवरा २९, सिरसम २५, बासंबा १८, नरसी नामदेव ११, डिग्रस २५, कळमनुरी ५२, नांदापूर ५८, आखाडा बाळापूर ४८, डोंगरकडा ३८, वारंगा फाटा ३५, वाकोडी ४५, वसमत २२, हट्टा २१, गिरगांव १६, कुरुंदा ६, आंबा ३५, औंढा नागनाथ ४५, जवळा बाजार २१, येळेगांव ५५, साळणा २०, सेनगांव २३, गोरेगांव ११, आजेगांव २५, पानकनेरगांव १०, हत्ता १५. 

लातूर जिल्हा ः लामजमा ७, किल्लारी ६, मातोळा ७, उदगीर १२, मोघा १५, हेर ११, देवर्जन ७, वाढवणा १०, नळगीर १०, नामलगांव १५, अहमदपूर १९, किनगांव ५, खंडाळी १४, शिरूर ताजबंद १२, हाडोळती १४, अंधोरी १०, चाकूर १०, वडवळ नागनाथ १०, नळेगांव ८, झरी ६, शेळगांव ११, जककोट १४, घोन्सी ११, निलंगा ६, अंबुलगा ८, कासार शिरसी ५, मदनसुरी औराद शहाजनी २३, कासारबालकुंदा ६, देवणी १५, वलांडी १५, बोरोळ १३, शिरुर अनंतपाळ ८, हिसामाबाद ५, साकोळ ९. 

उस्मानाबाद जिल्हा ः उस्मानाबाद शहर ५, उस्मानाबाद ग्रामीण ७, केशेगांव १०, तुळजापूर १२, सावरगांव ७, जळकोट १२, नळदुर्ग ७, मगंरुळ ११, इटकळ ७, उमरगा ७, मुरुम १०, नागरवाडी ६, मुळज ५, डाळिंब ७, लोहारा ११, माकणी १०, जेवळी ५.  

बीड जिल्हा ः चौसाळा ७, लिंबागणेश ७, दौलावडगांव ७, परळी ७.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT