Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे: निसर्ग चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.७) कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  निसर्ग चक्रीवादळामुळे बाष्प ओढून नेल्याने विदर्भ, मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुख्यत: कोरडे हवामान आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. तर कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या खाली उतरला असून, तापमानात चढ-उतार होत आहेत. शनिवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात कमाल तापमान ३२ ते ३९ अंश, मराठवाड्यात ३२ ते ३७ अंश, मध्य महाराष्ट्रात २३ ते ३६ अंश आणि कोकणात २९ ते ३५ अंशांदरम्यान आहे. आज (ता.७) कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नगर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.   

शनिवारी (ता.६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग) : कोकण : सांताक्रुझ ६५, जव्हार ५६, मोखेडा ३२, पालघर ३२, वसई ५९, विक्रमगड ३५, वाडा ३४, पनवेल ३१, देवगड ३५, आंबरनाथ ६६, भिवंडी ४०, कल्याण ३०, शहापूर ८१, उल्हासनगर ५३.  मध्य महाराष्ट्र : कोपरगाव ६३, राहता २९, राहुरी २३, श्रीरामपूर २१, अक्कलकुवा २४, हर्सूल १९, सटाना २४, घोडेगाव २१. मराठवाडा : फुलंब्री १७. विदर्भ : लाखणी १६, साकोली १५, गोरेगाव १८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT