विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे : वातावरणाच्या खालच्या थरात होत असलेल्या वाऱ्यांच्या संगमामुळे मेघगर्जना आणि विजांच्या निर्मितीसाठी पोषक हवामान होत आहे. विदर्भात आज (ता. १७) वादळी पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिवसाच्या तापमानात चढ-उतार होत असून, उन्हाचा चटकाही कायम राहणार आहे. राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असल्याने शनिवारी (ता. १६) चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर ब्रह्मपुरी, सोलापूर, परभणी येथे तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि नगर, सांगली, नांदेड, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, येथे तापमान ३८ अंशांपेक्षा अधिक होते. राज्यात सर्व ठिकाणी तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला आहे.  अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता १७) विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.    शनिवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.० (०.८), नगर ३८.६ (३.४), जळगाव ३६.० (-१), कोल्हापूर ३६.७ (१.४), महाबळेश्वर ३२.७ (२.३), मालेगाव ३५.२ (-१.३), नाशिक ३३.७ (-१), सांगली ३८.० (१.६), सातारा ३६.१ (१.३), सोलापूर ३९.१ (१.९), अलिबाग ३१.५ (०.७), डहाणू ३१.७ (०.७), सांताक्रूझ ३६.६ (३.७), रत्नागिरी ३३.५ (१.८), औरंगाबाद ३५.२ (-०.१), नांदेड ३८.० (१.५), परभणी ३९.० (२.४), अकोला ३७.७ (१.०), अमरावती ३८.८ (३.०), बुलडाणा ३३.५ (-०.२), बह्मपुरी ३९.४ (३.५), चंद्रपूर ३९.६ (२.६), गडचिरोली ३८.२, गोंदिया ३५.६ (०.३), नागपूर ३६.७ (०.९), वर्धा ३७.२ (२.२), वाशिम ३७.०, यवतमाळ ३८.५ (३.०).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT