समुद्रातील वादळी स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
समुद्रातील वादळी स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

समुद्रातील वादळी स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे मॉन्सून परतल्यानंतर राज्यात सुरू असलेला वादळी पाऊसही थांबला आहे. शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये एखाद दुसरा अपवाद वगळता राज्यात पावसाची उघडीप होती. अरबी समुद्रातील वादळी स्थितीमुळे उद्यापासून (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.    ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र दोन दिवसांपासून राज्यातील पाऊस थांबला आहे. आज (ता. ७) राज्यात निरभ्र व कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार होत असल्याने पोषक हवामान होऊन कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.   कमाल तापमानात वाढ झाल्याने ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढला आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील डहाणू येथे उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पारा ३५ अंशांच्या पुढे असून, जळगाव, मालेगाव, सांताक्रूज, रत्नागिरी, ब्रह्मपुरी येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंदविले गेल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.  शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.९, जळगाव ३६.४, कोल्हापूर ३१.२, महाबळेश्‍वर २६.०, मालेगाव ३६.०, नाशिक ३२.३, सांगली ३१.९, सातारा ३०.६, सोलापूर ३५.१, सांताक्रुज ३६.१, अलिबाग ३४.७, रत्नागिरी ३६.०, डहाणू ३७.८, आैरंगाबाद ३३.२, परभणी ३५.०, नांदेड ३५.०, अकोला ३५.६, अमरावती ३५.४, बुलडाणा ३४.५, ब्रह्मपुरी ३६.५, चंद्रपूर ३५.६, गोंदिया ३४.५, नागपूर ३४.९, वर्धा ३४.९, यवतमाळ ३४.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT