सासवड पाऊस
सासवड पाऊस  
मुख्य बातम्या

सासवड तालुक्यात पावसाने दाणादाण; भिवडी ढगफुटी

टीम अॅग्रोवन

सासवड, जि. पुणे : बुधवारी रात्री व्रजगड, किल्ले पुरंदर व लगतच्या डोंगरी भागात तब्बल साडेचार तास ढगफुटी झाली. त्यातून आलेल्या पुरात परिसरातील सासवडसह भिवडी, नारायणपूर, नारायणपेठ, चिव्हेवाडी आदी गावांमध्ये शेतजमीन, उभी पिके, घरे, गोठे, जनावरे, वाहने, छोटे पूल, साकव वाहिले, तर विहिरी गाळाने भरताना.. खचून रस्त्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. भिवडीत दोन महिला पुरात वाहिल्याचे सांगण्यात आले.  गजराबाई सुदाम खोमणे (वय ६५) व छकुली अनंता खोमणे (वय २२, दोघीही रा. खोमणेवस्ती, भिवडी, ता. पुरंदर) या भिवडी गावानजीक खोमणेवस्तीतून जाणाऱ्या ओढ्यात वाचवित असताना डोळ्यादेखत वाहून गेल्या. तर तेथील गावकऱ्यांनी वस्तीला पुराच्या पाण्याने दिलेल्या वेढ्यातून तब्बल सहा लोकांना वाचविण्यात यश मिळविले. तर भिवडीत रस्त्यालगतच्या लोकांनी नारायणपूरचे दोन भक्त रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात आमच्यासमोर वाहून गेल्याचे सांगितले. त्याबाबत निश्चित माहिती शासकीय यंत्रणेकडून मिळाली नाही. भिवडी गावातील ओढ्याने वज्रगडकडून आलेल्या ढगफुटीच्या पाण्याने रौद्ररूप धारण केले होते. ओढ्याच्या क्षमतेच्या पाचपट पाणी आल्याने लगतच्या कित्येक एकर शेतजमीन, कित्येक उभी पिके वाहून नेली. दोन बंधारे फुटले. अनेक विहिरी गाळाने भरल्या. ओढ्यालगतच्या कित्येक घरात पाणी शिरले. साधारणतः १० जनावरे या परिसरातून वाहून गेली. काम सुरू असलेले रस्तेही काही ठिकाणी खचले. याबाबत पोलिस पाटील अक्षय शिंदे, नरेश मोकाशी आदींनी सांगितले की, अजून आतल्या शिवेपर्यंतची माहिती आल्यावर नुकसान वाढेल.  नारायणपूरला पुराचा वेढा, घरांची पडझड श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथील ओढ्याने पात्रात अडथळे आल्याने नारायणपूर गावाला वेढा घालून घरातून, बोळांतून, गल्ल्यांतून मार्ग काढत.. घरांच्या भिंती, घरातील चिजवस्तू, दगड, वीटा, माती व वाहनेही वाहून नेली. येथे साधारणतः २५ हून अधिक घरांचे व त्याहून अधिक वाहनांचे नुकसान झाल्याचे भरतनाना क्षीरसागर, सदाशिव बोरकर यांनी सांगितले. स्वतः क्षीरसागर यांची घराची भिंत तोडून पाणी घरात घुसले, त्यांची मुलगी व पुण्यातील नगरसेविका संगीता ठोसर यांनी मुले कशी वाचविली हा प्रसंग सांगितला. शेतजमिनीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांनी सांगितले. दरम्यान, चिव्हेवाडी, केतकावळे, कुंभोशी, देवडी, पानवडी येथेही या अतिवृष्टीचा फटका बसल्याचे समजले. विशेषतः लगतचे डोंगर वा टेकड्या खचण्याचा धोका वाढल्याचे अनेकांनी सकाळशी बोलताना सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT