Rain barrier in paddy harvest
Rain barrier in paddy harvest 
मुख्य बातम्या

भातपीक कापणीत पावसाचा अडसर

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व होऊन कापणीयोग्य झालेले हळवे भातपीक धोक्यात आले आहे. परिपक्व झालेल्या भाताची कापणी कशी करायची असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे हळव्या भातांच्या एकूण सुमारे १५ हजार हेक्टर पैकी २० टक्के क्षेत्र कापणी योग्य झाल्याचा अंदाज आहे.

यंदा जिल्ह्यात सरासरी पाऊस गतवर्षी पेक्षा कमी झाला आहे. परंतु पेरणी ते लावणीच्या वेळेत पाऊस पडल्याने भात पीकही चांगले तरारले आहे. जिल्ह्यात हळवी, गरवी, निमगरवी अशा तीन प्रकारे भात लागवड केली जाते. त्यातील हळवी बियाणे १०० ते १०५ दिवसांत तयार होतात. कातळावर या प्रकारची लागवड होते. सध्या हळवी प्रकारची भात तयार झाली आहेत.

येत्या काही दिवसांत ती तयार होतील.  राजापूर तालुक्यातील काही ठिकाणी भात कापणी साठी तयार झालं आहे. परंतु गेले आठवडाभर जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. भातांच्या लोंबी तयार झाल्या आहेत. कातळावरील आणि हळव्या प्रकाराचे भातपीक कापणीयोग्य झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये साखर, जैतापूर, अणसुरे आदी गावात हे भातपीक परिपक्व झाले असून कापणीयोग्य झाले आहे. सततच्या पावसामुळे हे भात कापणीत अडचणी येत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT