Rabi sowing begins in Pune division 
मुख्य बातम्या

पुणे विभागात रब्बी पेरण्यांना सुरवात

पुणे ः थंडीस सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरवात केली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी दोन लाख ४४ हजार ७ हेक्टर म्हणजेच सरासरी १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात थंडी वाढल्यानंतर पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

टीम अॅग्रोवन

पुणे ः थंडीस सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरवात केली आहे. पुणे विभागात आतापर्यंत सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी दोन लाख ४४ हजार ७ हेक्टर म्हणजेच सरासरी १४ टक्के पेरण्या झाल्या आहेत. येत्या काळात थंडी वाढल्यानंतर पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

यंदा वेळेवर दाखल झालेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्याही वेळेवर सुरू झाल्या. त्यातच ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांची सुरवात झाली आहे. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, तीळ, जवस या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता पावसानेही चांगोलीच उघडीप दिली. त्यामुळे रब्बी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा या पेरण्यांना वेगाने सुरवात होण्याची शक्यता आहे.    

पुणे विभागातील नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिके काढणीच्या अवस्थेत आहे. बाजरीची काढणी वेगाने सुरू आहे. मूग व उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली. तूर पीक शेंगा लागण्यास सुरवात झाली आहे. भुईमूग पीक शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. कापूस पिके बोंड लागण्याच्या व कापूस काढणीच्या अवस्थेत आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या पेरणीस सुरवात झाली. रब्बी ज्वारीची एक लाख ६८ हजार २८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

इतर पिकांच्या पेरणीस काही तालुक्यांत सुरवात झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पीक पक्वतेच्या व काढणीच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी अंतिम टप्यांत आहे. भुईमूग पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. मका पीक काढणीच्या व कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये तूर पीक फुलोऱ्यात आहे. बाजरी पीक काढणी पूर्ण झाली आहे.

सूर्यफूल पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पिकांची काढणी सुरू आहे. रब्बी ज्वारी पिकांच्या पेरणीस सुरवात केली आहे. तर हरभरा, करडई, सूर्यफूल व मका पिकांच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Beed Crop Damage : बीड जिल्ह्यात २.२३ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

PM Modi Baramati Visit: पंतप्रधान मोदी ३ नोव्हेंबरला बारामती दौऱ्यावर शरद पवार यांची माहिती

Crop Damage Survey: परभणी जिल्ह्यात पीक नुकसान पंचनामे वेगाने

SCROLL FOR NEXT