Rabi area in Latur, Osmanabad, Beed, Parbhani and Hingoli districts increased by 36,000 hectares 
मुख्य बातम्या

लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील रब्बी क्षेत्रात ३६ हजार हेक्‍टरनी वाढ

लातूर : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या पेरणी क्षेत्रात ३६ हजार ३२७ हेक्‍टरची भर पडली आहे. उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ झाली. त्यामुळे ही वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

टीम अॅग्रोवन

लातूर : कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील रब्बीच्या पेरणी क्षेत्रात ३६ हजार ३२७ हेक्‍टरची भर पडली आहे. उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रात गत आठवड्याच्या तुलनेत किंचित वाढ झाली. त्यामुळे ही वाढ झाल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १० लाख ८६ हजार ६१० हेक्‍टर होते. त्या तुलनेत २० जानेवारीपर्यंत १३७ टक्‍के अर्थात १४ लाख ८६ हजार ६९७ हेक्‍टरवर पेरणी झाली. यामध्ये आता ३६ हजार ३२७ हेक्‍टरची आणखी भर पडली. त्यामुळे २७ जानेवारी अखेर प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र १५ लाख २३ हजार २४ हेक्‍टरवर पोहचले आहे. पेरणी क्षेत्रातील ही भर उस्मानाबाद, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यांत नोंदली गेली आहे. 

परभणी जिल्ह्यात गत आठवडाअखेर २ लाख ३७ हजार १७० हेक्‍टरवर पेरणी झाली होती. आता हे क्षेत्र २ लाख ५५ हजार २३९ हेक्‍टरवर पोहचले आहे. हिंगोली जिल्ह्यात आता १ लाख ७३ हजार ९९१ हेक्‍टरवर पोहचले आहे. लातूर, नांदेड जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रात मात्र कोणताही फरक पडलेला नाही. नांदेड जिल्ह्यात ३ लाख ३५ हजार २६० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

कापूस वेचणी, तूर काढणी पूर्ण

लातूर कृषी विभागात यंदा ३ लाख ९६ हजार ३५५ हेक्‍टरवर कपाशी होती. सरासरीच्या ७२ टक्‍के पेरणी झालेल्या कपाशीची वेचणी  ९५ टक्‍के पूर्ण झाली आहे. पाचही जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र ३ लाख ९ हजार ३२२ हेक्‍टर होते. त्या क्षेत्रावरील तूर पिकाचीही ९५ टक्‍के काढणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

ज्वारी, मक्यावर लष्करी अळी

ज्वारीची २ लाख ९६ हजार १८५ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. हे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. गव्हाचे १ लाख ४२ हजार ८०३ हेक्‍टरवरील पीक वाढीच्या, दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. हरभऱ्याचे पीक फुलोरा व घाटे अळीच्या अवस्थेत आहे. सर्वाधिक १० लाख ४० हजार ७४४ हेक्‍टरवर पेरणी झालेल्या हरभऱ्याच्या पिकावर घाटे अळीचा प्रादूर्भाव आहे. करडईवर माव्याचा, तर मका पिकावर काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादूर्भाव आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT