Rabbi developed sorghum hurdha varieties 
मुख्य बातम्या

रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्राने विकसित केलेला रब्बी ज्वारीचा हुरडा वाण पूर्वप्रसारित करण्यात आला आहे. यंदा या वाणांची चाचणी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर घेण्यात येत आहेत.

टीम अॅग्रोवन

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्राने विकसित केलेला रब्बी ज्वारीचा हुरडा वाण पूर्वप्रसारित करण्यात आला आहे. यंदा या वाणांची चाचणी प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर घेण्यात येत आहेत. हा वाण प्रसारणासाठी सज्ज आहे, अशी माहिती संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर आणि ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा पैदासकार डॉ. कमलाकर कांबळे यांनी दिली.

डॉ. वासकर म्हणाले, की परभणी येथे सन १९२८ मध्ये ज्वार संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. शताब्दी पूर्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या या केंद्राने आजवर खरीप ज्वारीचे परभणी श्‍वेता, परभणी साईनाथ आणि रब्बी ज्वारीचे परभणी मोती, सुपर मोती या सारखे धान्य तसेच कडबा उत्पादन देणारे एकाहून एक सरस वाण शेतकऱ्यांना दिले आहेत. काही वर्षांपूर्वी मराठवाड्यातील ज्वारीचे कोठार अशी परभणी जिल्ह्याची ओळख  होती. परंतु विविध कारणांनी परभणीसह मराठवाड्यातील अन्य ज्वारीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. परंतु आहारातील ज्वारीचे महत्त्व अबाधित आहे.

लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेला परभणी शक्ती हा वाण विकसित करण्यात आला आहे. उच्च पोषण मूल्ययुक्त तसेच प्रक्रिया उत्पादनासाठी उपयुक्त रब्बी ज्वारीच्या वाणांवर संशोधन सुरू आहे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक सिंचन पद्धतीने ज्वारी लागवड प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. ज्वारीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डॉ. कांबळे म्हणाले, की ज्वार संशोधन केंद्राने यापूर्वी प्रसारित केलेला  हुरडा वाण शेतकऱ्यांमध्ये फारसा लोकप्रिय ठरला नाही. त्यामुळे नवीन वाण हुरडा चवीला अधिक गोड आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Scheme: अपात्र ‘लाडक्या बहिणीं’ना पुन्हा ‘ई-केवायसी’चे मुख्यमंत्र्यांचे संकेत

Pawna Dam Strengthening: पवना धरण मजबुतीकरणाचा प्रश्न अधांतरी

Agricultural Pump Cable Theft: काठापूर बुद्रुक येथे २५ कृषिपंपांच्या केबल चोरी

Food Safety: अन्न, औषध प्रशासनाकडून आंबेगाव, खेड तालुक्यांत कारवाई

Dam Water Stock: धरणांत २७ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT