परभणी जिल्ह्यात रब्बीत पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी नियोजित
परभणी जिल्ह्यात रब्बीत पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी नियोजित  
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात रब्बीत पावणेतीन लाख हेक्टरवर पेरणी नियोजित

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये २ लाख ७५ हजार ४७५ हेक्टर पेरणी नियोजित करण्यात आली आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत रब्बीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. यंदा हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र सर्वाधिक राहील, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

विविध पिकांच्या एकूण ५० हजार क्विंटलवर बियाण्यांची मागणी महाबीज, खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे. विविध ग्रेडच्या ८५ हजार ५०० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.

यंदा सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सद्यःस्थितीत रब्बीच्या पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आहे. त्यामुळे मूग, उडदाच्या काढणीनंतर ज्वारी, करडई या पिकांची पेरणी सुरू करता येईल. परंतु सोयाबीन काढणीनंतर पेरणी करावयाची झाल्यास कोरडवाहू क्षेत्रात हरभरा, तर ओलाताखालील क्षेत्रात गहू पिकांची पेरणी होईल. जायकवाडी डावा कालवा तसेच मासोळी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे त्या भागात हरभरा, गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे.

नियोजित क्षेत्रात ज्वारी १ लाख १४ हजार हेक्टर, गहू ३६ हजार हेक्टर, हरभरा १ लाख २० हजार ७२५ हेक्टर, करडई २ हजार ५०० हेक्टर, सूर्यफूल २५ हेक्टर, मका १ हजार ५०० हेक्टर, जवस १२५ हेक्टर, तर इतर पिकांची ५० हेक्टरवर पेरणी होईल. याशिवाय रासायनिक खताच्या विविध ग्रेडच्या ८५ हजार ५०० टन खताची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ३१ हजार टन, डीएपी १२ हजार टन, पोटॅश ४ हजार, सुपर फास्फेट ७४ हजार टन, तर ३१ हजार १०० टन संयुक्त खतांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT