बुलडाणा जिल्ह्यात पणनची ७८ हजार क्विंटल हरभरा खरेदी Purchase of 78,000 quintals of marketing in Buldana district
बुलडाणा जिल्ह्यात पणनची ७८ हजार क्विंटल हरभरा खरेदी Purchase of 78,000 quintals of marketing in Buldana district 
मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्ह्यात पणनची ७८ हजार क्विंटल हरभरा खरेदी

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने या हंगामात जिल्ह्यात १० केंद्रावर हरभऱ्याची हमीभावाने खरेदी केली जात आहे. हंगामात आतापर्यंत सुमारे ७८ हजार क्विंटलपेक्षा अधिक हरभरा खरेदी झाल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी दिली. तर खरेदीपोटी शेतकऱ्यांना ३५ कोटींचे चुकारेही वितरीत झाल्याचे ते म्हणाले.  शासनाच्या नियमानुसार यंदा जिल्हा पणन कार्यालयामार्फत बुलडाणा, देऊळगावराजा, लोणार, मेहकर, मोताळा, संग्रामपूर, शेगाव, साखरखेर्डा, सिंदखेडराजा, उंद्री या १० केंद्रावर खरेदी सुरू करण्यात आली होती. यंदा हरभरा विकण्यासाठी १७,४२१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व शेतकऱ्यांना प्रशासनामार्फत मोबाइल संदेश देण्यात आले. यापैकी सुमारे साडे चार हजार शेतकऱ्यांचा ७८,७१४ क्विंटल हरभरा मंगळवारपर्यंत (ता.२५) खरेदी झाला होता. यात सर्वाधिक शेगाव केंद्रावर २५,५८७ क्विंटल खरेदी झाली. या शिवाय मोताळा केंद्रावर १३,९४७ क्विंटल तर साखरखेर्डा केंद्राने १०,२२४ क्विंटल खरेदी केली. इतरही केंद्रावर समाधानकारक खरेदी झाली. यंदा खुल्या बाजारातही आधारभूत किमतीच्या ५१०० बरोबरीने दर मिळाले. काही दिवस यापेक्षा अधिक दर मिळाला होता. तरीही शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत केंद्रावर आपला शेतमाल विक्रीसाठी आणला.  अशी झाली खरेदी

  •   हरभरा एकूण खरेदी-७८७१४ क्विंटल
  •   शेतकरी संख्या-४४९९
  •   खरेदी किंमत- ४० कोटी
  •   चुकारे- ३५ कोटी
  • प्रतिक्रिया

    यंदा शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पणन विभागाने १० केंद्रे उघडून खरेदी सुरू केली. शेगाव केंद्रावर सर्वाधिक २५ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला. शेतकऱ्यांना त्यांनी विकलेल्या मालाचे सुमारे ३५ कोटींचे चुकारेही खात्यात जमा केले आहेत. - पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

    Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

    Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

    Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

    Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

    SCROLL FOR NEXT