Pune will get funding for tourism development: Aditya Thackeray
Pune will get funding for tourism development: Aditya Thackeray 
मुख्य बातम्या

पुण्याला पर्यटन विकासासाठी निधी मिळवून देऊ ः आदित्य ठाकरे

टीम अॅग्रोवन

पुणे ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ऐतिहासिक (हेरिटेज) वास्तू व पर्यटनस्थळांचे सौंदर्य वाढवून या ठिकाणी पर्यटन विकासाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तुंबरोबरच पर्यटन विकासासाठीच्या निधीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्‍ट्रीय व्यवसाय केंद्रात (आयसीसी ट्रेड टॉवर) येथे विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर आदि अधिकारी उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात शिवनेरी, सिंहगड, शनिवारवाडा अशा अनेक ऐतिहासिक वास्तू व महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी विविध उपक्रम राबवून त्यांचे जागतिक पातळीवर महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधांसाठी लागणाऱ्या निधीचा सविस्तर प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा, जेणेकरून निधीची तरतूद करणे सोयीचे होईल.’’

शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून पर्यावरण रक्षण ही गरज आहे. पुण्यात राबवण्यात येणारा ‘कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाउनशिप’ उपक्रम राज्य पातळीवर राबवणे गरजेचे आहे, असेही ठाकरे म्हणाले. नगर नियोजन करताना व्यापक आराखड्यावर भर देणे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर द्यायला हवा. या वाहनांसाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. असेही ठाकरे म्हणाले. 

‘पुणे कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाउननशिप २०३०’ या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा पीआयसी चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय केळकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार, प्रा. अमिताव मलिक यांच्यासह पर्यावरण विभागातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मेकिंग पुणे कार्बन न्यूट्रल बाय २०३०’ या धोरणपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT