Pune Market Committee will start from Sunday
Pune Market Committee will start from Sunday 
मुख्य बातम्या

पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणार

टीम अॅग्रोवन

पुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड महिन्यांपासून बंद असलेला पुणे बाजार समितीमधील फळे, कांदा-बटाटा, केळी आणि पान विभाग रविवार (ता. ३१) पासून सुरू होणार आहेत. विविध धोरणात्मक निर्णयासह बाजारात विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने एक आडत्या एक वाहन आणि दिवसाआड विविध विभाग सुरू असणार आहे.

बाजार आवरातील गर्दी नियंत्रणबरोबरच शारीरिक अंतर राखण्यासाठी ‘एक अडत्या, एक वाहन’ या धोरणाप्रमाणे रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनास बाजार आवारात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच बाजार आवारातील गाळ्याच्या बर्हिगोल पाकळीची बाहेरच्या बाजूचे गाळेधारक अडते रविवारी (ता. ३१) तर आतील बाजूचे अडते सोमवार (ता. १) पासून पुढील प्रत्येक दिवशी दिवसाआड पद्धतीने व्यापार करतील.

शेतीमाल गाळ्यावर खाली झाल्यानंतर रिकामे वाहन बाजार आवाराच्या बाहेर काढण्यात येणार आहे. शेतीमाल घेऊन जाणारी वाहने दुपारी १२ वाजल्यानंतर बाजार आवाराच्या बाहेर काढण्यात येणार आहेत. सर्व अडते , शेतकरी व इतर बाजार घटकांनी बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्या समन्वयाने शेतीमालाची विक्री केली जाणार आहे.

असे आहे नियोजन

  • शेतीमाल विक्रीची वेळ पहाटे पाच ते दुपारी १२ पर्यंत
  • अडते, कामगार यांना ओळखपत्र तपासून गेट क्र. १ व गेट क्र. ४ ने प्रवेश
  • खरेदीदार व टेम्पो वाहनांना गेट क्र. ४ मधून ओळखपत्र तपासून प्रवेश
  • बाजार आवारात विक्रीकरिता शेतीमाल घेऊन येताना तो क्रेट व गोणीमध्ये आणण्याच्या शेतकऱ्यांना सूचना
  • मोकळ्या मालास बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही. (उदा. कलिंगड, टरबूज, पपई, मोसंबी, संत्रा इत्यादी)
  • बाजार आवारात मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक
  • अनुज्ञप्तीधारी अडत्यासच शेतीमालाची विक्री करता येईल
  • बाजारात रिकामी वाहने आढळल्यास दंडात्मक कारवाई म्हणून त्यांना बाजार आवारात कायम स्वरुपी प्रवेशबंदी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT