पुणे विभागात चाराटंचाईग्रस्त गावात बैठका सुरू
पुणे विभागात चाराटंचाईग्रस्त गावात बैठका सुरू 
मुख्य बातम्या

पुणे विभागात चाराटंचाईग्रस्त गावात बैठका सुरू

टीम अॅग्रोवन

पुणे ः यंदा कमी पावसामुळे पुणे विभागातील बहुतांशी गावांमध्ये आॅक्टोबरपासून पाणी, चाराटंचाई सुरू आहे. या गावांतील परिस्थिती लक्षात घेऊन आगामी काळातील चारा उपलब्धतेचे नियोजन करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावात बैठका घेण्याची कामे सुरू केली आहे. या बैठकीमध्ये गावातील नागरिकांसोबत चर्चा करून चाराटंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती देण्यात येत आहे.

शासनाने पुणे विभागातील नगर, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांतील बहुतांशी तालुके टंचाईग्रस्त तालुके म्हणून घोषित केली आहेत. या टंचाईग्रस्त तालुक्यांतील गावांची माहिती घेऊन चारा उपलब्धतेचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर कृषी अधिकारी व कर्मचारी यांची स्वतंत्र बैठक नुकतीच घेतली आहे.

या बैठकीत सध्या टंचाईग्रस्त तालुक्यात ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे, अशा ठिकाणी चारा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मक्याचे बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन आगामी काळात लागणारा चारा उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा फायदा घ्यावा. तसेच कृषी विभागाकडून पशुधनासाठी मुरघास उपलब्ध होण्यासाठी प्रात्यक्षिके घेण्याचे कामे सुरू करण्यात येणार आहे.  

चारा नियोजनासाठी शेतकऱ्यांसह साखर कारखाने, दूध संघ, खासगी संस्था यांनी पुढाकार घेऊन चारा उपलब्धता करून देण्याचे आवाहन केले जात आहे. तालुका बीज गुणन केंद्रावर नेपिअर गवताचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. त्यामुळे चारा उपलब्ध होऊन नेपिअरचे काही ठोंब निवडलेल्या गावात दिले जाणार आहे. त्याचीही माहिती गावपातळीवर शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्यामुळे चारा उपलब्धतेच्या अंदाजासाठी गावात बैठका सुरू केल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी गावातील चाराटंचाईचा आढावा घेण्यात येत आहे. यामध्ये पशुधनाची संख्या, चारा उपलब्धता, पाणी यांचे नियोजन करून त्या ठिकाणी चारा उपलब्धतेसाठी कोणते नियोजन करायचे यांची माहिती घेण्यासाठी गावनिहाय बैठका घेण्यात येत आहे. - दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

SCROLL FOR NEXT