In Pune district, crop loan will be repaid at 6% interest
In Pune district, crop loan will be repaid at 6% interest 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के व्याजाने परतफेड

टीम अॅग्रोवन

पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना आता पूर्ण सहा टक्के व्याजाने परतफेड करावी लागणार आहे. व्याजाची सवलत थेट लाभ हस्तांतरणानुसार (डीबीटी) नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या निणर्यानुसार प्राथमिक शेती सहकारी संस्थांच्या शेतकरी सभासदाना बँकेमार्फत सहा टक्के व्याजदराने पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. पीककर्जाची ३६५ दिवसांत वेळेवर परतफेड करणाऱ्या सभासदांना तीन लाखापर्यंतच्या रकमेसाठी केंद्र शासनाकडून तीन टक्के, तर राज्य शासनाकडून एक टक्का व्याज सवलत मिळते. जिल्हा बँक स्वत:च्या नफ्यातून सभासदांना आणखी दोन टक्के सवलत देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना शुन्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध होते.केंद्र व राज्य सरकारकडून सवलत रक्कम एक ते दीड वर्षांनी मिळते.

तरीही त्याची वाट न पाहता जिल्हा बँक सर्व व्याज सवलतीचा लाभ सभासदांना देते. तीन लाखापर्यंत शून्य व्याज सवलतीचा लाभ देणारी पुणे जिल्हा बँक देशातील एकमेव बँक आहे. चालू २०२०-२१ थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. कर्जदार शेतकरी सभासदांच्या बचत खात्यावर व्याज सवलतीची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे शासनाने कळविले आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील सभासद शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्जवाटप केले जाते. मात्र, यापुढे प्रथम व्याजासहित पीककर्जाची परत फेड करावी लागणार आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर व्याज सवलतीची रक्कम नंतर जमा केली जाईल. शून्य टक्के व्याजाच्या सवलतीचा लाभ शेतकरी सभासदांना पूर्वी प्रमाणेच मिळेल.  - प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा बॅंक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT