Provide water for wildlife in summer: Minister Yashomati Thakur 
मुख्य बातम्या

उन्हाळ्यात वन्यजिवांसाठी पाण्याची सोय करा ः मंत्री यशोमती ठाकूर

अमरावती ः उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी वन्यप्राण्याची होरपळ होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यासाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तसेच पालकमंत्री यशोगती ठाकूर यांनी केले.

टीम अॅग्रोवन

अमरावती ः उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी वन्यप्राण्याची होरपळ होते. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यासाठी जलपात्र बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तसेच पालकमंत्री यशोगती ठाकूर यांनी केले.

येथील वनमाला बहुउद्देशीय संस्था, स्वराज्य प्रतिष्ठान, साद फाऊंडेशन, दिशा बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्‍त सहकार्याने जलपात्र बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी यशोमती ठाकूर बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे सदस्य जयंत देशमुख, जितेंद्र ठाकूर, मनीष जगताप, निखील गाले, श्रध्दा पाटील, स्वप्ना पवार, प्रणय मेहरे, गौरव कडू, निलेश चौधरी, अक्षय इंगोले, अभी बारगे, प्रसाद पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.

पक्षी व वन्यजिवांची पाणी आणि अन्नावाचून उन्हाळ्याच्या दिवसात होरपळ होते. ही बाब लक्षात घेता प्रत्येकाने आपल्या परीने वन्यजिवांकरिता अन्न आणि पाण्याची व्यवस्था करावी. या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा उद्देशही साधता येईल, अशी भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्‍त केली. यावेळी सुमारे दीड हजार जलपात्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती मनिष जगताप यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Market: खानदेशात मका आवक रखडत

India EU Free Trade Agreement: उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांवर भर द्या

Agriculture Value Chain: शेतीमाल मूल्यसाखळीत ‘कॉर्पोरेट’ला आणावेच लागेल

Irrigation Update: धोम-बलकवडी कालव्याला ४५० क्युसेकने आवर्तन

Jal Jeevan Mission: स्वच्छ पाण्यासाठी आता होणार ‘जल सेवा आकलन’

SCROLL FOR NEXT