पीककर्जाची मर्यादा वाढविण्यासह गावापर्यंत खत, बियाणे पोहचवा : तुपकर 
मुख्य बातम्या

पीककर्जाची मर्यादा वाढविण्यासह गावापर्यंत खत, बियाणे पोहचवा : तुपकर

देशात बनलेली सद्यस्थिती पाहता यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांची मोठी अडचण होऊ शकते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

टीम अॅग्रोवन

बुलडाणा: देशात बनलेली सद्यस्थिती पाहता यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांची मोठी अडचण होऊ शकते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. यंदा शेतकऱ्यांना पीककर्जाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, शेतकऱ्यांना त्यांच्यागावापर्यंत खत आणि बियाणे उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेतर्फे रविकांत तुपकर यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

तुपकर यांनी म्हटले की, सध्या सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वच व्यवसाय आणि व्यवहार बंद आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आला असून पेरणीसाठी शेतकरी सज्ज होत आहेत. अशा परिस्थितीत पेरणीसाठी खरीपाचे नियोजन अत्यावश्यक झाले आहे. यावर्षी मशागतीसह खते, बियाण्यांचा व उत्पादन खर्च वाढला आहे त्यामुळे जिल्ह्यात स्केल ऑफ फायनांन्स समितीची तत्काळ बैठक घेऊन पीककर्ज मर्यादा वाढवावी. पीककर्जाची रक्कम 30 मे पूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पडेल, अशी व्यवस्था करावी. 

जिल्ह्याला खरीप हंगामात किमान सव्वा लाख टन खत लागते. त्या अनुषंगाने खतांचा साठा उपलब्ध करावा तसेच शेतकऱ्यांसाठी खत, बियाणे गावात पोच करण्याची सुविधा करावी. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. परिणामी पीककर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व प्रोसेसिंग फी माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. पीककर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करावी. संगणीकृत सातबारा ग्राह्य धरण्याच्या सूचना बॅकांना देण्यात याव्यात. 

पेरणीचा काळ लक्षात घेता कृषी केंद्रांना सकाळी 9 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात यावी. पीककर्ज वाटपाच्या मदत कामात कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक व शिक्षक यांची गावपातळीवर समिती तयार करावी. बॅंकांना कर्मचारी वाढविण्याबाबत सूचना द्यावात. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनाही नव्याने पीककर्ज सहजरित्या उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी आर. जी. पुरी यांची भेट घेऊन तुपकर यांनी या सर्व सूचना त्यांच्यासमोर मांडल्या. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT