Provide 24 hours power supply to agricultural pumps in Gadchiroli 
मुख्य बातम्या

गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करा

गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी, शेतकरी सिंचन करण्यास असमर्थ ठरत आहेत.

टीम अॅग्रोवन

गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी, शेतकरी सिंचन करण्यास असमर्थ ठरत आहेत. या विरोधात शेतकरी व शिवसैनिक पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांनी दिला. 

वितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल व गडचिरोली, चंद्रपूरचे मुख्य अभियंता देशपांडे यांच्या विरोधात आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला कमी कालावधीसाठी वीजपुरवठा दिला जात असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. तालुक्‍यातील गेवर्धा फिडरमध्ये शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा द्यावा, म्हणून हजारो शेतकऱ्यांच्या माध्यमातून आंदोलन करुण निवेदन देण्यात आली. 

कृषिपंपांचे थकीत बिल भरण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत १४ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला. त्यानंतर देखील शेतकरी हिताचा एकही निर्णय घेण्यास वीज वितरण कंपनीला यश आले नाही. २४ तास वीजपुरवठा करण्यास देखील वीज कंपनी असमर्थ ठरली आहे.

हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या विरोधात तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. दिवाळीनंतर विजय सिंगल व देशपांडे यांचा पुतळा तयार करून त्यांचा निषेध करणार असल्याचेही चंदेल यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT