Process, a new alternative to floriculture through value addition: Tomar 
मुख्य बातम्या

प्रक्रिया, मूल्यवर्धनातून फूल शेतीचा नवीन पर्याय ः तोमर

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पुष्पसंशोधनातून चालना मिळेल. फुलांच्या विविध वाणांद्वारे आणि त्यांच्या प्रक्रिया, मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना फूल शेतीचा नवीन पर्याय मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला.

टीम अॅग्रोवन

पुणे ः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला पुष्पसंशोधनातून चालना मिळेल. फुलांच्या विविध वाणांद्वारे आणि त्यांच्या प्रक्रिया, मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना फूल शेतीचा नवीन पर्याय मिळेल, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला.

भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पुष्पसंशोधन संचालनालयाच्या नुतन इमारत आणि प्रयोगशाळेचे उद्घघाटन दूरदृष्प्रणालीद्वारे सोमवारी (ता. ३) संचालनालयाच्या मांजरी (हडपसर) येथील प्रक्षेत्रावर मंत्री तोमर यांच्या हस्ते झाले. यावेळी  केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. तिलोचन महापात्रा, संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद आदी मान्यवरांसह विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ, शेतकरी उद्योजक दूरदृष्प्रणालीद्वारे उपस्थित होते. 

मंत्री तोमर म्हणाले, ‘‘पुष्पसंशोधनासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. या प्रयोगशाळेतून फुलांच्या नवीन वाणांसह प्रक्रिया आणि मूल्यवर्धनावर संशोधन होईल. हे संशोधन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल. संशोधन कार्याबद्दर कृषिमंत्री तोमर यांनी फूल संशोधकांचे अभिनंदन केले. डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी संशोधनाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘संचालनालायच्या माध्यमातून विविध फुलांच्या वाणांवर संशोधन सुरू आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी

Horticulture Development : आंबा पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT