Presence of unseasonal rains in Buldana district 
मुख्य बातम्या

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी दिली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी गव्हाचे पीक जमिनीवर लोळले आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हातातोंडाशी आलेले रब्बीची पिके वाया तर जाणार नाहीत ना, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.  जिल्ह्यात बुलडाणा तालुक्यात मंगळवारी व बुधवारी विजेच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या स्वरूपात पाऊस झाला. या आपत्तीचा रब्बी पिकांना तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.  सध्या गव्हाचे पीक ओंबी भरण्याच्या अवस्थेत आहे. या स्थितीत वादळामुळे पीक जमिनीवर लोळल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्ह्यात सिंदखेडराजा, मेहकर, लोणार तालुक्यात या वातावरण बदलामुळे धडकी भरवली आहे. मेहकर तालुक्यात बुधवारी काही ठिकाणी पावसाच्या सरी आल्या. शिवाय पावसाळी वातावरण बनल्याने हरभरा काढणी करीत असलेल्यांची झोप उडाली आहे. सध्या या तालुक्यात हरभरा सोंगणीला वेग आलेला आहे. पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यापासून शेतकरी हरभऱ्याचे पीक वाचवण्यासाठी धावपळ करीत आहेत. सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा परिसरातसुद्धा पावसाने हजेरी दिली. या भागातही रब्बीतील गहू, हरभऱ्याच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. लोणारमध्येही अशीच शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे.   

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT