Presence of light, heavy rains in many parts of Khandesh
Presence of light, heavy rains in many parts of Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात अनेक भागांत हलक्या, जोरदार पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात बुधवारी (ता.९) दुपारी व सायंकाळी अनेक भागात पाऊस झाला. पण पावसात सातत्य नाही. पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अपवाद वगळता पेरणीला कुठेही वेग आलेला नाही. पेरणीसाठी किमान ६० ते ६५ मिलिमिटर पावसाची गरज आहे, असेही कृषी यंत्रणांनी म्हटले आहे. 

‘‘पावसाळी वातावरण गेले काही दिवस आहे, पण पेरणीयोग्य किंवा ४० ते ६५ मिलिमीटर पाऊस कुठेही झालेला नाही. फक्त यावल तालुक्यातील सावखेडासीम व लगत रविवारी (ता.६) रात्री जोरदार पाऊस झाला होता. ६० ते ६२ मिलिमीटर पाऊस या भागात झाला. पण यात जमिनी खरडून गेल्या’’, अशी माहिती शेतकरी अनिल विश्राम पाटील यांनी दिली. 

कोरडवाहू कापूस लागवड सुरू झालेली नाही. कारण चांगला पाऊस अपेक्षित आहे. धूळपेरणीदेखील अनेकांनी पावसाच्या अनियमिततेमुळे टाळली आहे. कापूस, तूर, उडीद-मूग, सोयाबीनचे बियाणे महाग आहे. यामुळे पेरणीबाबत शेतकरीदेखील चांगल्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. बुधवारी दुपारी जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, चोपडा, यावल, एरंडोल आदी भागात हलका ते मध्यम पाऊस झाला, पण कुठेही २५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नाही. 

धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा व धुळे भागातही हलका पाऊस झाला. नंदुरबारात शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागात हलका पाऊस झाला. जळगाव तालुक्यात पिंप्राळा मंडळांत ११ मिलिमीटर पाऊस झाला. यात काही गावांत अगदी तुरळक पाऊस आहे. अशीच स्थिती इतर भागातही आहे. पेरण्या वेळेत होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

कोरडवाहू पिकांची पेरणी नाही 

हमीभावदेखील जाहीर झाल्याने पेरणीचे अचूक नियोजन शेतकरी पुढे करतील. सातपुडा पर्वातही  पावसाने हजेरी लावलेली नाही. ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. सकाळी ढग जमा होतात. दुपारी उन्हाचे चटके बसतात, अशी स्थिती आहे. यामुळे सातपुड्यातील शेती क्षेत्रातही कोरडवाहू पिकांची पेरणी झालेली नसल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT