अवकाळीचा आजपासून अंदाज
अवकाळीचा आजपासून अंदाज 
मुख्य बातम्या

अवकाळीचा आजपासून अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण झाले. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आजपासून (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पाऊस पडणार आहे. तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.  

राज्यातील व देशातील वातावरणात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी उन्हाचा चटका, तर काही ठिकाणी उन्हाची लाट असे प्रकार घडत आहेत. त्यातच गुरुवारी उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि परिसर बिहार ते पूर्व विदर्भ पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रीय होत आहे. कोमोरिनचा भाग आणि परिसर ते उत्तर कर्नाटक या भागांत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.

तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर सुमात्रा किनारपट्टीदरम्यान चक्रिय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. झारखंड आणि छत्तीसगडचा उत्तर भाग व परिसरात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर ते १.५ किलोमीटरच्या दरम्यान आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत असून कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण आहे.

सध्या काही भागांत अंशत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे उकाड्यात किंचित घट झाल्याने कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. काही भागांत किमान तापमानातही वाढ झाली आहे. पुणे येथे १९.३ सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

येथे अवकाळी पावसाची शक्यता शुक्रवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा शनिवार ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT