विदर्भात उद्यापासून गारपिटीचा इशारा 
विदर्भात उद्यापासून गारपिटीचा इशारा  
मुख्य बातम्या

विदर्भात उद्यापासून गारपिटीचा इशारा 

टीम अॅग्रोवन

पुणे : विदर्भ, मराठवाड्यात उन्हाचा झळा वाढू लागल्या आहेत. तर अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात घट झाली आहे. पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्याने विदर्भात आज वादळी पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. १०) मेघगर्जना, विजांसह, गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे.  पावसाला पोषक हवामानामुळे ढगाळ हवामान होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. वारे वाहत असल्याने राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. पुढील काळात उन्हाचा चटका वाढत जाणार आहे. रविवारी (ता. ८) विदर्भातील ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर वाशीम येथे ३५ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ३४.६, वर्धा ३४.५, तर नांदेडमध्ये ३४.० सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमानाचा पारा ३० ते ३३ अंशांदरम्यान आहे. पुढील काळात उन्हाचा चटका हळूहळू वाढत जाणार आहे.  उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमान होते. तर धुळे येथे १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ९) विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. १०) विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.    

रविवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.८ (१५.६), नगर ३३.३, धुळे ३०.० (१०.६), जळगाव ३२.० (१३.६), कोल्हापूर ३१.५ (१९.५), महाबळेश्‍वर २५.५ (१५.२), मालेगाव ३२.४ (१४.४), नाशिक २९.४ (१२.३), निफाड २८.१ (९.१), सांगली ३२.० (१९.८), सातारा ३१.७ (१७.०), सोलापूर ३३.२ (२२.०), अलिबाग ३३.६(१६.८), डहाणू २९.२ (१७.९), सांताक्रूझ २९.५ (१७.७), रत्नागिरी ३१.० (२१.०), औरंगाबाद ३०.५(१६.४), परभणी ३२.२(१८.०), नांदेड ३४.०(१३.५), अकोला ३३.६(१६.८), अमरावती ३२.८(१८.८), बुलडाणा २९.६(१६.६), ब्रह्मपुरी ३५.३, चंद्रपूर ३४.६(१९.६), गोंदिया ३०.०(१८.२), नागपूर ३३.२(१७.६), वर्धा ३४.५(१९.२), वाशीम ३५.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT