Poultry at Rs. 10 per bird per day 
मुख्य बातम्या

पोल्ट्रीमध्ये प्रति पक्षी दररोज दहा रुपयांचा फटका

कडक लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचा थेट फटका पोल्ट्री उद्योगातील शेतकऱ्यांना बसत आहे. यंदा उन्हाळ्यातही चांगली मागणी असूनही किरकोळ चिकन विक्रीची दुकाने बंद असल्याने असूनही विक्रीसाठी तयार असलेल्या कोंबड्याची शेतकऱ्यांना विक्री करता येत नाही.

Abhijeet Dake

सांगली ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाउन करण्यात आले आहे. त्याचा थेट फटका पोल्ट्री उद्योगातील शेतकऱ्यांना बसत आहे. यंदा उन्हाळ्यातही चांगली मागणी असूनही किरकोळ चिकन विक्रीची दुकाने बंद असल्याने असूनही विक्रीसाठी तयार असलेल्या कोंबड्याची शेतकऱ्यांना विक्री करता येत नाही. त्यामुळे कुक्कुट व्यावसायिक शेतकऱ्यांना तयार पक्षी जगवण्यासाठी प्रती पक्षाला दर दिवसाला ८ ते १० रुपयांचा अतिरिक्त खर्चाचा फटका सोसावा लागत आहे. जिल्ह्यात १९ मे ते २६ मेपर्यंत कडकडीत लॉकडाउन करण्यात आले आहे.

त्यानुसार कुक्कुटपालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३८ ते ४० दिवसाची कोंबडी विक्री करता येते. आता मात्र चिकन सेंटर बंद असल्याने १५ ते २० दिवस जास्ती सांभाळावी लागली आहे. तयार कोंबड्याच विक्री करता येत नसल्याने नवीन पिले टाकावीत की नाही याचा विचार कुक्कुट उत्पादक करत आहेत. जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाला १५ ते २० कोटींहून अधिक आर्थिक फटका बसला आहे

जिल्ह्यात १८ लाख पक्षी अंड्यावरील तर बॉयलर म्हणजे मांसल पक्षी २० लाख पक्षी आहेत. कोट्यवधींची उलाढाल होते. गेल्या वर्षभरापासून चिकन आणि अंड्यांची मागणी वाढ झाली. अंडी आणि चिकनला दरही अपेक्षित मिळू लागला. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला दिलासा मिळाला. दरम्यान, गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे शासनाने काही प्रमाणात निर्बंध देखील घालण्यात आले होते. किरकोळ चिकन दुकानांना सकाळी ७ ते अकरा पर्यंतची वेळे देण्यात आली होती. त्यामुळे किरकोळ चिकन विक्रीची दुकाने सुरू होती. त्यामुळे कोंबड्यांना मागणी असल्याने विक्री होत होती. त्यामुळे पोल्‍ट्री व्यावसायिकांनी पक्षांची प्लेसमेंट देखील केली होती. गेल्या काही दिवसांत कोंबडींचा दरही वाढला होता. वास्तविक पाहता, बॉयलर कोंबडी ३८ ते ४० दिवसांत विक्रीसाठी तयार होते. त्यानंतर नवीन प्लेसमेंट केली जाते. मात्र, मे महिन्याचा पाच तारखेपासून जिल्ह्यात कडक लॉकडाउनचे निर्बंध जाहीर केले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाउन केला आहे. पण त्यामध्ये किरकोळ चिकन विक्री दुकाने बंद केली आहे. त्यामुळे बॉयलर कोंबडी विक्रीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. चिकन सेंटर सुरू करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. - वसंतकुमार सी. शेट्टी, अध्यक्ष पोल्ट्री फार्मर अ‍ॅण्ड ब्रीडर असोसिएशन, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT