Postponement of release of water from Rena project
Postponement of release of water from Rena project 
मुख्य बातम्या

रेणा प्रकल्पातून पाणी सोडण्यास स्थगिती

टीम अॅग्रोवन

रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर) येथील रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्थगिती दिली.

नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत पाणी पिण्यासाठी पुरेल असे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. संबंधित यंत्रणेने प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, असे आदेशही श्रीकांत यांनी दिले.   घनसरगाव येथील शेतकऱ्यांनी पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी करून आत्मदहनाचा इशारा दिला. त्यावरून पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची तयारी चालवली होती. हे लक्षात येताच रेणापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी मागच्या तीन दिवसांपासून प्रकल्पाच्या दरवाजासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी तहसीलदारांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत माघार घेण्याची विनंती केली. ग्रामस्थांनी ती फेटाळत आंदोलन सुरूच ठेवले. 

शुक्रवारी श्रीकांत यांनी आंदोलनकर्ते आणि पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक घेतली. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. पर्यावरणातील बदलानुसार जुलैपर्यंत पाऊस पडत नाही. त्यामुळे ऑक्‍टोबरपर्यंत पाणी पुरेल याची काळजी घ्या, असे ते म्हणाले. रेणापूर नगरपंचायतीकडे थकबाकी नसल्याचे स्पष्ट झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT