नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ 
मुख्य बातम्या

नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस रुपयांनी वाढ

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी (ता. १७) काही प्रमाणात डाळिंबाच्या दरात वाढ झाली. डाळिंबाला सरासरी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मागील आठवड्यात हा दर ३० ते ४० रुपये रुपये प्रतिकिलो होता. डाळिंबांची आवक घटल्याने दरात वाढ झाल्याच्या डाळिंब खरेदीदार सांगत आहेत. एकट्या नगर बाजार समितीत आतापर्यंत सुमारे ४५ हजार क्विंटल डाळिंबाची आवक झालेली पंचवीस कोटीपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे.

नगर- जिल्ह्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. बारामाही उत्पादनाचे फळपीक असले तरी नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी आंबिया बहार धरतात. त्यामुळे साधारण एप्रिलपासून डाळिंबाचे उत्पादन निघण्यास सुरवात होते. सप्टेंबर अखेरपर्यंत आवक सुरू राहते. नगर जिल्ह्यामध्ये राहाता, राहुरी, नगर, कोपरगाव, संगमनेर बाजार समितीत डाळिंबाचे लिलाव होतात. नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातूनही येथे बऱ्यापैकी आवक होत असते. गेल्या पाच महिन्यांचा विचार करता एकट्या नगर बाजार समितीत सुमारे पंचवीस लाखांपेक्षा अधिक रकमेची डाळिंबातून उलाढाल झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून परराज्यांतून मागणी वाढत असल्याने डाळिंबांच्या भावात वाढ होत आहे. आवक घटल्याचाही दर वाढीला फायदा होत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, कोलकता, राजस्थान, दिल्ली, जम्मू आदी राज्यांत नगर जिल्ह्यातून डाळिंब जातात. नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण साधारण प्रतिवीस किलोचे सहा ते सात हजार क्रेट म्हणजे शंभर ते सव्वाशे क्विंटल डाळिंबाची आवक होत होती. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रतिकिलोला दहा रुपये ते तीस रुपये सरासरी दर मिळत होता. सोमवारी मात्र प्रतिकिलोला पन्नास ते साठ रुपये दर मिळाला असून जवळपास चाळीस ते पन्नास क्विंटलने आवक घटली आहे.

उत्पादनात घट नगर जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या महिनाभरापासून डाळिंबावर तेल्यासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून, काही प्रमाणात त्याचा दरावरही परिणाम झाला आहे. मात्र आता दरात वाढ झाली असली तरी रोगाच्या प्रादुर्भावाचा उत्पादनावर परिणाम झाला आहे.

‘नेप्ती उपबाजार समितीत डाळिंबांची आवक कमी झाली असून, भावात सुमारे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यात डाळिंबाचे भाव किलोमागे वीस ते पंचवीस रुपयांनी वाढले आहेत. अलीकडच्या काळातील हे चांगले दर आहेत.’ अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea Brand : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT