महासंचालकांना अटक
महासंचालकांना अटक 
मुख्य बातम्या

लाचप्रकरणी वाल्मीच्या महासंचालकासह सहसंचालकास पोलिस कोठडी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : लाच प्रकरणात अटक करण्यात आलेले वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी व अधीक्षक अभियंता तथा सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी शनिवारी (ता. ३०) दिले.  औरंगाबादच्या वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी (रा. मूळ नाशिक, सध्या रा. वाल्मी), आणि अधीक्षक अभियंता व सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर (मूळ रा. पुणे, सध्या. रा. वाल्मी वसाहत) यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने दहा लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शुक्रवारी (ता. २९) रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर अटकेतील दोघांनाही शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी जिल्हा मुख्य सरकारी वकील ॲड. अविनाश देशपांडे यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दोघांनाही ४  जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.  वाल्मीच्या विज्ञान शाखेचे तक्रारदार प्राध्यापक यांना वाल्मीचे महासंचालक गोसावी आणि अभियंता क्षीरसागर हे त्यांचे कायमस्वरूपी निलंबन व्हावे या हेतूने त्रास देऊन दोन ते तीन महिन्यांपासून प्राध्यापकांना सतत मेमो दिले जात होते. ‘तुमची नेमणूक चुकीच्या पद्धतीने झाली आहे, तुम्ही दिलेली शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे बोगस आहेत,’ असा आरोप केला होता. तसेच कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत होते. याशिवाय ज्या संस्थेने कायम केले आहे, ते रद्द करू व निलंबित करू, असे सांगितले होते. निलंबन रोखणे आणि कागदपत्रे परत मिळविण्यासाठी गोसावी आणि क्षीरसागर यांनी दहा लाखांची मागणी प्राध्यापकांकडे केली होती.  या त्रासाला कंटाळलेल्या प्राध्यापकांनी एवढे पैसे देणे जमणार नाही. पाच ते सहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, गोसावी आणि क्षीरसागर यांनी दहा लाख रुपये द्यावेच लागतील, असा पावित्रा घेतला. त्यामुळे शेवटी प्राध्यापकांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी हरिभाऊ गोसावी यांनी राजेंद्र क्षीरसागर यांच्यामार्फत दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.  कारवाईनंतर लाचलुचपत विभागाने दोघांच्याही पुणे, नाशिक, सोलापूर येथील घरीही झाडाझडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.   लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक श्री. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक वर्षाराणी पाटील, बाळा कुंभार, निरीक्षक प्रमोद पाटील, पोलिस नाईक हरिभाऊ कुजहे, गोपाळ बरंडवाल, संदीप आव्हाळे, शिपाई होनराव, अरुण उगले आणि बाळासाहेब राठोड यांनी ही कारवाई केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT