पुणतांब्यातील कृषी कन्यांचे आंदोलन मोडून काढले; गावकऱ्यांकडून निषेध
पुणतांब्यातील कृषी कन्यांचे आंदोलन मोडून काढले; गावकऱ्यांकडून निषेध 
मुख्य बातम्या

पुणतांब्यातील कृषी कन्यांचे आंदोलन मोडून काढले; गावकऱ्यांकडून निषेध

टीम अॅग्रोवन

नगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे शेतकऱ्यांच्या मुलींनी सहा दिवसापुर्वी सुरु केलेले "अन्नत्याग' अंदोलन शासनाने आज (शनिवारी) पहाटे अक्षरशः मोडून काढले. उपचाराला नकार देणाऱ्या तरुणींना जबरदस्तीने उपचारासाठी नगरला हलवले असून अंदोलनासाठी उभारलेला मंडपही काढून घेतला. पुणतांब्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध करत आज दुपारपर्यत गाव बंद ठेवून निषेध सभा घेतली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्यावर्षी देशभर गाजलेल्या शेतकरी संपाची सुरवात पुणतांबा येथून झाली होती. त्यानंतर सरकारने भरभरुन अश्‍वासने दिली होती, मात्र त्या अश्‍वासनाची पुर्तता झाली नाही. त्यामुळे गेल्या 4 फेब्रुवारीपासून पुणतांबा येथे निकिता धनंजय जाधव, पुनम राजेंद्र जाधव, शुभांगी संजय जाधव या शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग अंदोलन सुरु केले. पहिले चार दिवस प्रशासनाने अंदोलनाची आजीबात दखल घेतली नाही. चौथ्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे यांनी उपोषण कर्त्या तरुणींची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र त्यांचेही प्रयत्न असफल झाले. चौथ्या दिवशी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली, मात्र अन्य उपोषण कर्त्या तरुणींसह गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले नव्हते, मात्र शुक्रवारी गावकऱ्यांचा विरोध मोडून शुभांगीला उपचारासाठी नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत भेट देऊन माहिती घेणार असल्याची चर्चा होती, मात्र ते आले नाही. मात्र आज शनिवारी पहाटे पोलिसांनी निकिता धनंजय जाधव, पुनम राजेंद्र जाधव यांना बळजबरीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच अन्नत्याग अंदोलन करत असलेल्या ठिकाणचा मंडपही सबंधित मंडप मालकाला काढून घ्यायला लावत शेतकऱ्यांच्या कृषी कन्येचे अंदोलन मोडून काढले. पुणतांबा गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून आज शनिवारी दुपारपर्यत गाव बंद ठेवले व सरकारच्या भूमिकाचा निषेध करत निषेध सभा घेतला. दरम्याण गावांतील काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT