अनोंदणीकृत कीडनाशकांच्या आयातीवर हवे नियंत्रण
अनोंदणीकृत कीडनाशकांच्या आयातीवर हवे नियंत्रण  
मुख्य बातम्या

अनोंदणीकृत कीडनाशकांच्या आयातीवर हवे नियंत्रण

वृत्तसेवा

हैदराबाद : भारतीय अटी व नियमावलींनुसार नोंदणी न करताच व कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या देखरेखीविना देशात कीडनाशकांची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज भारतातील लघू व मध्यम कीडनाशक उत्पादक कंपन्यांच्या संघाने व्यक्त केली आहे.  संघाचे अध्यक्ष महेंद्र रेड्डी म्हणाले, की दरवर्षी परदेशातून किमान १८० अब्ज रुपये मूल्य असलेल्या कीडनाशकांची आयात भारतात होते. त्यावर गुणवत्तेच्या दृष्टीने कोणतीही देखरेख वा तपासणी होत नाही. अशा प्रकारच्या आयातीचा देशांतर्गत कृषी रसायन उद्योगाला धोका पोचत आहे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित कीडनाशक व्यवस्थापन कायदा-२०१७ मध्ये भारतीय कंपन्यांनाही उद्योग सुलभ करता यावा यादृष्टीने धोरण राबवणे गरजेचे आहे.  कीडनाशकाच्या सक्रिय घटकांची नोंदणी करणे अनिवार्यच असले पाहिजे. अन्यथा ठराविक बहुराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी कीडनाशक उद्योगात निर्माण होईल. भारतीय कंपन्यांना त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणे अडचणीचे ठरेल, असेही रेड्डी यांनी म्हटले आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणेच्या अडथळ्याविना देशात दरवर्षी कीडनाशकांची आयात होते. त्याचा देशातील कीडनाशक उद्योगाला धोका पोचत आहे.  - महेंद्र रेड्डी, अध्यक्ष, भारतीय लघू व मध्यम कीडनाशक उत्पादक संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT