कृषी विद्यापीठ करार  
मुख्य बातम्या

ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `पंदेकृवि’चा करार

टीम अॅग्रोवन

अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. या तंत्राद्वारे पिकांचे सखोल निरीक्षण केल्यास पीकवाढीच्या अनेक समस्या अत्यंत अल्पावधीत निकाली काढल्या जाऊ शकतात, ही उपलब्धी लक्षात घेता ड्रोन तंत्राद्वारे पिकांचे दृष्टीपरीक्षण (स्कॅनिंग) करणे व त्यावर आधारित माहितीच्या आधारे अचूक शेती सल्ला देता यावा, या दृष्टिकोनातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अॅमेझिंग एरीअल सोलुशन्स प्रा. लि. पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.  याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्षस्थानी होते. उपस्थितांमध्ये संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. एन. डी. पार्लावार, प्राध्यापक डॉ. ए. एन. पसलावार, डॉ. अनिल करुणाकर, डॉ. जे. पी. देशमुख, डॉ. एम. आर. देशमुख, यांच्यासह अॅमेझिंग एरिअल सोलुशन्स प्रा. लि. पुणेचे संचालक आनंद देशपांडे उपस्थित होते. ड्रोन तंत्राद्वारे पीक निरीक्षण व दृष्टी परीक्षण करणे सुकर होणार असून या तंत्राच्या माध्यमातून निघणाऱ्या निष्कर्षाकडे कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांसह शेतकरी वर्गाचे लक्ष राहील आणि अतिशय अचूक पद्धतीने जमीन, पीक, कीड, रोग आदींबाबतची माहिती उपलब्ध होऊन फायद्याची शेती दृष्टीपथास येईल, असा आत्मविश्वास कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केला.   अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच सामंजस्य करार असल्याने काळजीपूर्वक निरीक्षणे नोंदविण्याचे आवाहनसुद्धा डॉ. भाले यांनी या करारप्रसंगी केले. कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या महत्त्वाकांक्षी सामंजस्य करारवर विद्यापीठाच्यावतीने संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, तर अॅमेझिंग एरिअल सोलुशन्स प्रा. ली. पुणे यांचे वतीने संचालक श्री. मिलिंद मोडक यांनी कुलगुरू डॉ.  भाले यांचे उपस्थितीत स्वाक्षरी केली.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले, तर कृषी विद्याविभागाचे प्रा. डॉ. जयंत देशमुख यांनी आभार मानले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Treatment: बीजप्रक्रियेचे ८ फायदे! मूग, उडिद, सोयाबीन, तूर, भूईमुग यांच्या बीजप्रक्रियेची घरगुती पद्धत

Tomato Farming: टोमॅटो पिकात रोप कोलमडणे, मर रोगाचे नियंत्रण

Agriculture Pump Cable Theft: झोडगा धरणावरील कृषी पंपांच्या केबल चोरीला

AI in Indian Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या...

Farming Challenges: अस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरी धास्तावला

SCROLL FOR NEXT