Nashik Vegetable Cluster : नाशिकमध्ये कृषी क्रांती! १२४ कोटींच्या 'भाजीपाला क्लस्टर' प्रकल्पाची घोषणा; शेतकऱ्यांना होणार थेट फायदा
Prime Fresh Limited : नाशिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथून राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमांतर्गत देशातील १२ फलोत्पादन क्लस्टर्सच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये नाशिकच्या पेरी अर्बन भाजीपाला क्लस्टरचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी प्राइम फ्रेश लिमिटेडची अंमलबजावणी संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.