Pay the dues from Chosaka immediately 
मुख्य बातम्या

‘चोसाका’कडील थकीत रक्कम त्वरित द्यावी

टीम अॅग्रोवन

चोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे असलेली ६०१ रुपये प्रतिटन रक्कम अजूनही थकीत आहे. ही रक्कम त्वरित मिळावी, यासाठी शेतकरी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे ऑनलाइन निवेदनाद्वारे मागणी केली. 

निवेदनानुसार, शेतकऱ्यांचे साखर कारखान्याकडे घेणे असलेली ६०१ प्रतिटन रक्कम आजही त्यांच्याकडे घेणे आहे. २०१८ मध्ये त्यांनी जर एफआरपी ७५ टक्के दिलेली असेल, तर आपणास कर्ज मिळेल, असे सांगितले. प्रत्यक्षात एफआरपी दिली नसताना देखील ३०० रुपये प्रतिटनप्रमाणे संपूर्ण शेतकऱ्यांनी ठेव ठेवली. ना कारखान्यास कर्ज मिळाले, ना शेतकऱ्यांना एफआरपी. त्यामुळे शेतकऱ्यांची बाकी असलेली संपूर्ण एफआरपी व आरआरसी आदेशानुसार त्यावरील व्याज हे शेतकऱ्यांना देय आहे. ते वसूल करून देण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने आपणावर सोपवली आहे. 

हा साखर कारखाना आता बारामती ॲग्रोने भाडेतत्त्वावर घेतला आहे. त्यांनी वरील संपूर्ण रक्कम कारखान्याकडे सुपूर्द केली असल्याचे समजते. या कारखान्याचे संचालक मंडळ व अधिकारी हे शेतकऱ्यांचे पैसे बळजबरी शेअर खात्यात लिहून घेत आहेत. कारखान्यात शेतकऱ्यांचे शेअर्स आहेत. आज हा कारखाना भाडेतत्त्वावर १५ वर्षांसाठी दिला आहे. त्यामुळे ही रक्कम जमा करून घेणे अन्यायकारक आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना खाईत लोटणारा व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग करणारा आहे. त्यामुळे आपण हस्तक्षेप करून न्याय द्यावा, संबंधित रक्कम आपल्याकडे घेऊन शेतकऱ्यांना वाटप करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर शेतकरी कृती समिती सदस्य एस. बी. पाटील, नितीन निकम, नारायण पाटील, प्रदीप पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT