परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत अतिवृष्टी  Parbhani district Overcast in two circles
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत अतिवृष्टी  Parbhani district Overcast in two circles 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत अतिवृष्टी 

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांमध्ये रविवारी (ता. २६) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड या तालुक्यांतील दोन मंडलांत अतिवृष्टी झाली. रविवारी (ता. २६) दुपारी अडीचच्या सुमारास परभणी, तसेच अन्य मंडलांत ढगांच्या गडगडात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे निचरा होत नसल्यामुळे उभी पिके सडत आहेत. कापणीची कामे खोळंबल्याने सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. बोंडांतून फुटलेला कापूस भिजून सरकीतून कोंब फुटत आहे. निसर्गाने तोंडचा घास हिरवून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.  परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत सरासरी १७.२ मिमी पाऊस झाला. जिंतूर, गंगाखेड, सोनपेठ, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांमध्ये जोरदार पाऊस झाला. चारठाणा (ता. जिंतूर), पिंपळदरी (ता. गंगाखेड) मंडलात अतिवृष्टी झाली. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांमध्ये सरासरी १३ मिमी पाऊस झाला. पालम तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला होता. निम्न दुधना धरणातील विसर्ग वाढविण्यात आल्यानंतर शेतामध्ये पाणी शिरून सेलू, मानवत तालुक्यातील नदीकाठच्या गावातील पिके हातची गेली आहेत. हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुक्यांतील काही मंडलांत जोरदार पाऊस झाला. सिद्धेश्‍वर धरणातील विसर्गामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरल्याने औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील पिकांचे नुकसान झाले. पाऊस उघडीप देत नसल्याने पीक नुकसानीचे सत्र सुरूच आहे. शेतमालाची प्रत खालावली आहे. 

मंडलनिहाय पाऊस (१५ मिमीच्या पुढे)  परभणी : चारठाणा ६८.३, बामणी ३७, सेलू २१.३, चिकलठाणा ३८.३, मोरेगाव ३१.५, रामपुरी १८,सोनपेठ २०, आवलगाव २३.३, शेळगाव १५.५, वडगाव ४३.५, गंगाखेड २९, महातपुरी ३८.३,माखणी ३२.२, राणीसावरगाव ३५.३ पिंपळदरी ८०.३, चुडावा २०, पालम ४१.८, चाटोरी २१, रावराजूर ३३.३.  हिंगोली जिल्हा : हिंगोली ४६.८, नरसी नामेदव १८.८, सिरसम ६१.५, डिग्रस कऱ्हाळे ३०.३, माळहिवरा ३२, वारंगा २९, येळेगाव २३.८, सेनगाव १५.५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT