परभणी जिल्हा बॅंकेचे पीककर्जवाटप दर जाहीर
परभणी जिल्हा बॅंकेचे पीककर्जवाटप दर जाहीर  
मुख्य बातम्या

परभणी जिल्हा बॅंकेचे पीककर्जवाटप दर जाहीर

टीम अॅग्रोवन

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने यंदासाठी परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकनिहाय प्रतिहेक्टरी पीककर्ज वाटपाचे दर निश्चित केले. सोयाबीनसाठी प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, ठिबक सिंचन पद्धतीवरील कपाशीसाठी ७५ हजार रुपये, बागायती कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये, तर जिरायती कपाशीसाठी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये या प्रमाणे कर्ज दिले जाईल. हळदीसाठी प्रतिहेक्टरी १ लाख २५ हजार रुपये पीककर्ज दिले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने चालू आर्थिक वर्षात जिरायती, हंगामी बागायती, बारमाही बागायती, भाजीपाला, फळ, फुलझाडे, चारा, रेशीम शेती, संरक्षित शेती आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी कर्ज वाटपाचे दर निश्चित केले. जिरायतीत भुईमुगासाठी ४०, सूर्यफुलासाठी २५, साळीसाठी (भात) ४० ते ४५, ज्वारीसाठी ३५, तुरीसाठी ३५ आणि बाजरीसाठी ३० हजार रुपये दराने कर्ज दिले जाणार आहे.

बारमाही बागायती पिकांमध्ये ऊसासाठी १ लाख २० हजार ते १ लाख २५ हजार रुपये, आडसाली ऊसासाठी १ लाख ३० हजार रुपये, खोडवा ऊसासाठी १ लाख १० हजार रुपये, केळीसाठी १ लाख १० हजार रुपये, टिश्यू कल्चर केळीसाठी १ लाख ४० हजार रुपये, हळदीसाठी १ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज मिळेल. रब्बी पिकांमध्ये हरभरा आणि गव्हासाठी प्रत्येकी ३० हजार रुपये, भूईमुगासाठी ४५ हजार रुपये, करडईसाठी २७ हजार रुपये दराने कर्ज मिळेल. 

भाजीपाल्यात वांग्यासाठी ६७ हजार ३००, मिरचीसाठी ७७, टोमॅटोसाठी ७७ हजार ४००, कांद्यासाठी ७७, कांदा बिजोत्पादनासाठी १ लाख २१ हजार, दोडक्यासाठी ५५, कारल्यासाठी ५१ हजार ५००, कलिंगडासाठी ३९ हजार ६००, बटाट्यासाठी ७५, फ्लाॅवरसाठी ३७, तर आल्यासाठी १ लाख १० हजार रुपये दराने कर्ज देण्यात येईल. 

फळपिकांत संत्र्यासाठी ८२ हजार ५००, मोसंबीसाठी ८२ हजार ५००, आंब्यासाठी १ लाख ३० हजार, द्राक्षासाठी ३ लाख ८ हजार, डाळिंबासाठी १ लाख ४३ हजार, चिकूसाठी ५५ हजार, पेरूसाठी ६० हजार ५००, लिंबासाठी ७७ हजार, नारळासाठी ६६ हजार, सीताफळासाठी ५५ हजार, आवळ्यासाठी ४४ हजार, पपईसाठी ४४ हजार, बोरासाठी ३३ हजार रुपयांप्रमाणे कर्ज मिळेल. शेडनेट पाॅलिहाउसमधील संरक्षित शेती पिकांमध्ये गुलाब, लिलियमसाठी ४ लाख २६ हजार, जरबेरा, कार्नेशनसाठी ६ लाख १० हजार, कोरफड, आॅरचिडसाठी ७० हजार, ढोबळी मिरचीसाठी १ लाख ४० हजार रुपये कर्ज मिळेल. फूलझाडांमध्ये अॅस्टरसाठी ४१ हजार १००, शेवंतीसाठी ४१ हजार १००, झेंडूसाठी ४४ हजार, गुलाबासाठी ५५ हजार, मोगऱ्यासाठी ४३ हजार ६००, जाईसाठी ४३ हजार ६०० रुपये दराने कर्ज दिले जाईल.

अन्य पिकांमध्ये तुतीसाठी १ लाख १० हजार, पानमळ्यासाठी ५ हजार, चाऱ्यातील गजराज गवतासाठी ४२ हजार ४००, लसूण गवत, पवना गवतासाठी ७९ हजार २००, हिरव्या मक्यासाठी ३८ हजार ५००, हिरव्या ज्वारीसाठी २७ हजार ५०० रुपये दराने कर्ज मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT