साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावा : पंजाबराव पाटील
साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावा : पंजाबराव पाटील 
मुख्य बातम्या

साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावा : पंजाबराव पाटील

टीम अॅग्रोवन

सातारा : साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करीत साखर कारखानदार आता ठरलेला भाव देण्यास नकार देत आहेत. ही बाब दुर्दैवी असून, साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावावा, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदन दिल्याचे नमूद करून श्री. पाटील म्हणाले, की ऊस उत्पादकांसमवेत झालेल्या बैठकीत पहिला हप्ता तीन हजार रुपये देण्याचे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी मान्य केले होते. पण, आता साखरेचे दर पडल्याचे कारण पुढे करीत आता तेच कारखानदार दोन ते अडीच हजार रुपये दर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तीन महिने झाले तरी जिल्ह्यातील कारखानदारांनी बिले काढली नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने साखर कारखानदारांवर ‘मोका’ लावावा, अशी मागणी आम्ही जिल्हाधिकऱ्यांकडे केली आहे.  हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉँग्रेस शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. परंतु, त्यांची भूमिका दुटप्पी वाटते. कारण जिल्ह्यातील बहुतांश कारखाने हे पक्षाच्या विचाराच्या प्रतिनिधींचे आहेत. मंगळवारी (ता. ६) झालेल्या या पत्रकार परिषदेस बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सातारा तालुकाध्यक्ष श्रीकांत चव्हाण, खटाव तालुकाध्यक्ष संदीप बुधवाळे, माण तालुकाध्यक्ष विकास नरळे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT