पोलीस, वाहन चालकांमध्ये पणन मंडळ साधणार समन्वय
पोलीस, वाहन चालकांमध्ये पणन मंडळ साधणार समन्वय  
मुख्य बातम्या

पोलीस, वाहन चालकांमध्ये पणन मंडळ साधणार समन्वय

टीम अॅग्रोवन

पुणे : कोरोना लॉकडाऊनमध्ये बाजार समित्या बंद असताना शहरातील फळे भाजीपाला आणि किराणा मालाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वाहन चालकांना पोलिसांचा होत असलेल्या त्रास कमी करण्यासाठी कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला आहे. यासाठी पोलीस आणि वाहन चालकांच्या संवाद आणि समन्वयासाठी हेल्पलाईन आणि टोल फ्री  १८००-२३३-०२४४  क्रमांक सुरु केला आहे.  शहरात लॉखडाऊनमध्ये शेतमालाची विस्कळीत झालेली पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी विविध गृहनिर्माण सहकारी संस्थांना छोट्या वाहनांद्वारे (३ चाकी, ४ चाकी, पिकअप वाहन आदी ) शेतमाल पुरवठ्याची मागणी होत आहे. मात्र काही वेळा वाहने उपलब्ध होत नाहीत. तर अनेक वेळा पोलिसांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट व शेतमाल पुरवठादार आणि छोट्या वाहन चालक मालकांनी पणन मंडळाच्या किसान हेल्पलाईन क्रमांक १८००-२३३-०२४४ द्वारे आपली नोंदणी वाहनाचा क्रमांक चालक, मालकांच्या नावे क्रमांकासह करावी. या वाहनांची माहिती पोलीस प्रशासनासह शेतकऱ्यांना दिली जाईल. यामध्येही काही अडचण आल्यास पोलिसांसोबत सुसंवाद आणि समन्वय साधला जाईल, असे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.  मात्र हे करत असताना वाहन चालक, मालक आणि शेतकऱ्यांनी यांनी शहरी भागात शेतमालाचा पुरवठा करीत असताना त्यासाठी आवश्यक ते परवाने कृषी विभागाकडून घ्यावेत. पणन मंडळ केवळ पोलीस आणि वाहन चालकांसोबत समन्वय साधणारा दुवा असणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT