यंत्राव्दारे भात लागवड
यंत्राव्दारे भात लागवड 
मुख्य बातम्या

मावळ तालुक्यात ९० एकरांवर यंत्राव्दारे भात लागवड प्रात्यक्षिके

टीम अॅग्रोवन

पुणे :  कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणेअंतर्गत (आत्मा) मावळ तालुक्‍यात सुमारे ९० एकर क्षेत्रांवर यंत्राद्वारे भात लागवडीची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहे. त्यासाठीच्या रोपवाटिका तयार झाल्या आहेत.

या वर्षी मावळ तालुक्‍यातील बधलवाडी, फळणे, बेलज, कशाळ,वडेश्वर, माऊ, वारू, येळसे, सडवली आदी गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर ही प्रात्यक्षिके राबवली जाणार आहे. याची सुरवात फळणे, कशाळ व वारू या गावांतून झाली आहे. मावळ तालुक्‍यातील पुंडलिक जोरी, नथुराम लष्करी व नथु घरे या शेतकऱ्यांनी स्वतः भात लागवड यंत्र खरेदी केले आहे. या यंत्राद्वारेच यावर्षी भात लागवड सुरू आहे.

आत्माअंतर्गत प्रतिएकर दोन हजार रुपये रोपवाटिका तयार करणे व यंत्राद्वारे लागवडीसाठी भाडेपट्टी असे एकूण चार हजार रुपये अनुदान या प्रात्यक्षिकांसाठी देण्यात येते. या यंत्राद्वारे दिवसाला अडीच ते तीन एकर क्षेत्रांत भात लागवड होते. तसेच यामुळे दोन ओळी व दोन रोपांतील अंतर समान राहत असल्यामुळे बियाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली.

आ्त्माचे प्रकल्प संचालक  अनिल देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल घोगरे, कृषी विभागाचे अधिकारी एन. बी. साबळे, एस. एस. ताकवले, बी. एस. पवार, ए. के. वरवडे, एस. डी. जाधव हे मदत करत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT