शेतकरीविरोधी सरकार उलथवून टाका ः छगन भुजब
शेतकरीविरोधी सरकार उलथवून टाका ः छगन भुजब 
मुख्य बातम्या

शेतकरीविरोधी सरकार उलथवून टाका ः छगन भुजबळ

टीम अॅग्रोवन

मुंबई : भाजपवाले शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकणार म्हणतात, हासुद्धा भाजपचा एक नवा चुनावी जुमलाच आहे. पैसे टाकतीलसुद्धा. यांना रिझर्व्ह बँक खालीच करायची आहे, पण लक्षात घ्या, परत सत्तेत आले तर तुमच्याकडून दहापट वसूल करतील, असा इशारा देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने देशात आणि राज्यात बळिराजाचेे राज्य आणूया, परिवर्तनाच्या या लाटेत शेतकरीविरोधी, जातीयवादी सरकारला उलथवून टाकूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.

महाड येथे गुरुवारी (ता. १०) राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 

अजित पवार म्हणाले,‘‘आता राज्यात, देशातील सत्ता उलथून टाकल्याशिवाय गप्प बसायचे नाही. ‘रेटून बोल पण खोटं बोल’ अशी यांची वृत्ती आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT