Outbreak of viral disease on tomatoes in Satana taluka 
मुख्य बातम्या

सटाणा तालुक्यात टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव

नाशिक : मालेगाव कृषी उपविभागातील सटाणा तालुक्यातील टोमॅटो उत्पादक गावांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान लागवड झालेले क्षेत्र या विषाणूजन्य रोगांना बळी पडल्याचे दिसून आले आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : मालेगाव कृषी उपविभागातील सटाणा तालुक्यातील टोमॅटो उत्पादक गावांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान लागवड झालेले क्षेत्र या विषाणूजन्य रोगांना बळी पडल्याचे दिसून आले आहे. 

कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी आसखेडा, वाघळे, उत्राणे, जायखेडा येथे भेटी देत बाधित क्षेत्राची पाहणी केली. या वेळी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला नाही; परंतु काही ठिकाणी नागअळी व कोळी किडीचा (माईटस) प्रादुर्भाव दिसला. नुकसान झालेल्या लागवडी पूर्ण दुरुस्त होणे अवघड आहे. मात्र नवीन लागवडी व नुकत्याच लागवड क्षेत्रात प्रादुर्भावापासून बचावासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या. 

साधारणपणे २० ते २८ दिवस वयाची रोपे लागवडीसाठी वापरावीत. विभागवार शिफारशीत प्रमाणित वाणांचीच लागवडीसाठी निवड करावी. आवश्यकतेप्रमाणे वाफसा बघून सिंचन करावे. पिकांची फेरपालट करावी व विषाणूंची साखळी तोडण्यासाठी एकपिक पध्दतीचा वापर टाळावा. फवारणी करताना किटकांच्या बंदोबस्तासाठी बांधावरही फवारणी करावी. वेळोवेळी तणांचा बंदोबस्त करून पीक ताणविरहित ठेवावे. रोगग्रस्त झाडे, फळे वेळीच दूर नेऊन नष्ट करावीत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी  दिलीप देवरे, तंत्र अधिकारी गोकूळ अहिरे यांनी केले.

   एकात्मिक पीक व्यवस्थापन करा  

नत्रयुक्त खताचा असंतुलित वापर, अनधिकृत उत्पादनांचा वापर टाळावा. सापळा पीक म्हणून टॉमेटो पिकाच्या कडेला मका पिकाची लागवड करावी. प्रमाणित कीडनाशके व जैविक घटकांचा वापर करण्याबरोबर एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन देवरे  यांनी केले. 

टोमॅटो पिकात विषाणूजन्य व करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. रसशोषक कीड, बुरशीजन्य रोग, फळे पोखरणाऱ्या अळी यासह फूलगळ टाळण्यासाठी व फळवृध्दी वाढविण्यासाठी शिफारसीत निविष्ठांच्या फवारण्या कराव्यात. - पवन चौधरी, विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, वडेल, ता. मालेगाव. 

आढळून आलेली लक्षणे  

  •  फळे कडक होणे.
  •  फळे न पिकणे, पांढरट हिरवे पिवळसर चट्टे दिसणे.
  •  फळ अर्धवट पिकणे, फळांचा आकार बदलणे.
  • फळे पिवळी पडून सुरकुत्या पडणे.
  • झाडांची शेंडे पिवळे पडणे, फळे बारीक राहणे.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Flood Damage: बांध-बंधारे फुटले, रस्त्यांची वाताहत

    Women Farmers: साधने, अवजारांनी केले महिलांचे कष्ट हलके

    Flood Relief: ‘आनंदाच्या शिधा’चा सरकारला पडला विसर?

    Agrowon Podcast: तूर दर मंदीतच, सोयाबीन दरावर दबाव, गवार तेजीत, कांदा दर कमीच तर आल्याचे दर टिकून तर

    Agriculture Production: नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य; प्रकाश आबिटकर

    SCROLL FOR NEXT