Outbreak of conch snail in soybean in Osmanabad district 
मुख्य बातम्या

उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव

बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता. औसा) परिसरासह येडशी (ता.उस्मानाबाद) येथे सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

टीम अॅग्रोवन

बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता. औसा) परिसरासह येडशी (ता.उस्मानाबाद) येथे सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 

मंडळ कृषी अधिकारी बेलकुंड यांच्या पथकाने विविध प्लॉटला भेटी देत नियंत्रण व्‍यवस्‍थापन करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत गुरुवारी (ता. २२) चर्चा केली. या वेळी कृषी पर्यवेक्षक विकास लटूरे यांनी याबद्दलची उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितली.

लटुरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी बांध स्वच्छ ठेवावेत. त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा राहणार नाही. सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात. शेतामध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी दिवसा त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्यास्तापूर्वी त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून नष्ट करावीत. लहान शंखीसाठी मिठाची फवारणी करावी. शंखी प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. शेताभोवती बांधापासून आत तंबाखू भुकटीचा अथवा चुन्याचा ५ सें.मी. रुंदीचा पट्टा टाकावा.``  

झाडाच्या खोडास १० टक्के बोर्डोंपेस्ट लावल्यास गोगलगायी झाडावर चढत नाहीत. मेटाल्डिहाईड या रसायनाचा वापर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार करावा. शिफारशीत कीटकनाशक, पाणी, गूळ, गव्हाचा अथवा भाताचा कोंडा या मिश्रणाचे आमिष तयार करावे. ते शेतामध्ये ढिगाच्या स्वरूपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरूपात टाकावे. या  आमिषापासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. यावेळी कृषी अधिकारी गणेश राऊत, कृषी सहायक आशिष काळदाते उपस्थित होते.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delayed Rainfall: पाऊस लांबल्याने पीक नियोजनाची गरज

NCP Sharad Pawar: मतदारसंघ पुनर्रचनेवर अद्याप भूमिका नाही : सुप्रिया सुळे

Polyhouse Farming: सांगाड्याच्या साहित्यानुसार पॉलिहाउसचे प्रकार

Farm Electricity Dues: ४८ हजार कोटींची वीजबिल थकबाकी, 'हा तर मोठा घोटाळा?'; शेतकरी नेत्यांचा गंभीर आरोप

Beed Farmers' Protest: शेतकऱ्यांचा बीड-पिंपळनेर मार्गावर 'रास्ता रोको'

SCROLL FOR NEXT