संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

विखे यांचा वारसदार निवडण्याचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली ः राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा स्वीकारल्यानंतर त्यांचा वारसदार तातडीने निवडावा, असे आदेश कॉंग्रेस श्रेष्ठींनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तांत्रिकदृष्ट्या अंतिम असलेल्या पावसाळी अधिवेशनात कॉंग्रेसचा नवा विरोधी पक्षनेता असेल. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्याचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आमदारांची बैठक बोलवावी आणि नव्या नेत्याची निवड करावी, अशा आशयाचे पत्र अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पाठविल्याचे सूत्रांकडून समजले. राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन अखेरचे असून त्यानंतर विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे लवकरात लवकर नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान नगरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसला सोडण्यास नकार दिल्यामुळे नाराज विधिमंडळ पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविली. तेव्हापासूनच विखे पाटील यांच्या कॉंग्रेसमधील भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह लागले होते. नगरच्या जागेसाठी कॉंग्रेसकडून योग्य प्रकारे वाटाघाटी झाल्या नसल्याची नाराजी व्यक्त करणाऱ्या विखे पाटील यांनी आडवळणाने प्रदेश नेतृत्वालाही लक्ष्य केले होते. तसेच कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याचे टाळून पक्षश्रेष्ठींकडे पदाचा राजीनामा पाठवून दिला होता.

आक्रमक चेहऱ्याची गरज निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला धारेवर धरू शकेल, अशा ज्येष्ठ आणि आक्रमक धरणारा आक्रमक चेहऱ्याची कॉंग्रेसला आवश्‍यकता आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मेस आहे. त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकेल, असे कॉंग्रेसमधून सांगितले जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT