Oranges to be exported to Bangladesh by rail
Oranges to be exported to Bangladesh by rail 
मुख्य बातम्या

बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा निर्यात

टीम अॅग्रोवन

नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा उत्पादक तसेच निर्यातदारांना कमी खर्चाचा आणि वेळेची बचत करणारा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. नागपुरी संत्र्याची बांगलादेशला सर्वाधिक निर्यात होते. त्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे अधिकारी, निर्यातदारांनी बांगलादेश सीमेनजीकच्या स्थानकांची पाहणी केली. 

विदर्भात नागपूर संत्रा खालील सर्वाधिक क्षेत्र आहे. सुमारे एक लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा आहे. त्यापासून सुमारे सात लाख टन फळांचे उत्पादन होते. त्यातील सुमारे दीड लाख टन संत्र्याची बांगलादेशला निर्यात केली जाते. यापूर्वी संत्रा निर्यातीकरिता रस्ते वाहतुकीचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. यामध्ये बांगलादेशला संत्रा पोहोचण्यास बराच कालावधी लागतो. संत्र्यांची टिकवणक्षमता कमी असल्याने संत्रा खराब होण्याची देखील भीती राहते. त्यासोबतच रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून संत्रा निर्यात केल्यास प्रति टन ५००० रुपये इतका प्रचंड खर्च होतो. 

गेल्या वर्षीपासून किसान रेल्वेचा पर्याय शेतकरी व निर्यातदारांना उपलब्ध करून दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून किसान रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या शेतमाल वाहतुकीसाठी अनुदानदेखील उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शेतकरी व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला. परिणामी गेल्या वर्षीच्या हंगामात देशाअंतर्गत १८०० टन संत्रा वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून झाली. शालिमार तसेच आझादपूर मंडी दिल्लीमध्ये हा संत्रा पाठविण्यात आला होता. या वर्षीदेखील किसान रेल्वेचा पर्याय संत्रा वाहतूकदारांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याकरिता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वरुड येथे संत्रा निर्यातदार यांची बैठक घेतली. त्यामध्ये या वर्षीच्या हंगामात जास्तीत जास्त संत्रा देशातील बाजारपेठांसोबतच बांगलादेशला निर्यात व्हावा यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेश नजीकच्या बनगाव, जेडे, बेनापोल स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासोबतच कस्टम क्लीअरिंगसाठी असलेल्या टेट्रापोल भागालाही भेट देण्यात आली.

बनगाव रेल्वे स्टेशनचा पर्याय शेतीमाल वाहतुकीकरिता भारतीय हद्दीपर्यंतच किसान रेल्वेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. गेल्या वर्षी बांगलादेशमधील बेनापोल स्थानकापर्यंत संत्रा वाहतूक करण्याचे प्रस्तावित होते. परंतु या ठिकाणी रेक खाली करण्याची सुविधा पर्याप्त नाही. त्यामुळे अन्य स्थानकांची चाचपणी केली जात होती. पश्‍चिम बंगालमधील बनगाव स्थानक हे बांगलादेशपासून अवघ्या सात किलोमीटर, तर जेडे स्थानक हे अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर आहे. यातील जेडे स्थानकावर संत्रा खाली करण्यासाठीच्या सुविधा पर्याप्त आहेत. त्यामुळे या स्थानकाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ठिकाणी संत्रा पोहोचल्यानंतर तेथून ट्रकद्वारे बांगलादेशला पाठविण्यात येईल. रेल्वे अधिकारी व निर्यातदारांनी गुरुवारी (ता. २३) या भागात भेट दिली. स्थानकावरील सुविधांचा आढावा घेतल्यानंतर लवकरच किसान रेल्वे सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या भारतीय हद्दीपर्यंत होणाऱ्या वाहतुकीसाठी किसान रेल्वेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. अनुदान बांगलादेश संत्रा निर्यात करणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांना देण्यात आल्यास मोठा फायदा होणार आहे याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.  - रमेश जिचकार,  सचिव, इंडो-बांगला ऑरेंज एक्स्पोर्टर असोसिएशन  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Rearing : गोपालनात ऋतुनिहाय बदलांना प्राधान्य

Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Ravindranath Tagor : चीनवर मोहिनी घालणारा साहित्यिक

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT