Orange growers deprived of help 
मुख्य बातम्या

संत्रा उत्पादक मदतीपासून वंचित

गेल्या वर्षी मे महिन्यात चक्रीवादळामुळे घरांसह संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून सर्वेक्षण आणि पंचनामे करण्यात आले. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

टीम अॅग्रोवन

अमरावती : अंजनगावसुर्जी तालुक्यात गेल्या वर्षी मे महिन्यात चक्रीवादळामुळे घरांसह संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून सर्वेक्षण आणि पंचनामे करण्यात आले. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. ती त्वरित मिळावी, अशी मागणी धाणेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्‍यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्याकडे केली आहे.

अंजनगावसुर्जी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले होते. अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेले. संत्रा बागांमधील फळांची गळ झाली. त्यासोबतच इतर पिकांचे देखील नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण आणि पंचनामे व्हावे, अशी मागणी त्या वेळी शेतकऱ्‍यांनी रेटली होती. सर्वेक्षणासाठी विविध पातळ्यांवर निवेदने देण्यात आली. त्याच्या परिणामी प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले.

दरम्यान, राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागासाठी भरपाई जाहीर केली. त्याचे वाटपदेखील राज्यातील बहुतांश गावांमध्ये झाले. धनेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील मदत जाहीर झाली. गावातील काही शेतकऱ्यांना मदत मिळालीदेखील; परंतु ७५ टक्के शेतकरी निधीच्या कमतरतेमुळे अद्यापही भरपाईपासून वंचित आहेत. त्यांच्याकडेच आणि तिची उपलब्धता व्हावी यासाठी तहसीलदार स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र निधीची उपलब्धता न झाल्याने गेल्या वर्षभरापासून धनेगाव येथील बहुतांश शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान, अन्यायग्रस्त आणि भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांनी आमदार बळवंत वानखडे यांची भेट घेतली. वंचित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याकरिता आमदारांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. प्रदीप येवले, सुनील येवले, गोपाल भुयार, विनोद सरदार, अंकुश पांडे, गजानन येवले, रोशन पोहनकर, प्रशांत पोहनकर, प्रमोद येवले, शुभम येवले, एकनाथ येवले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT