विधानसभा
विधानसभा 
मुख्य बातम्या

विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज चव्हाण, वडेट्टीवार नावे चर्चेत

टीम अॅग्रोवन

नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. सोमवारी (ता.२०) यासंदर्भातील प्रक्रिया मुंबईत पार पडणार असून, या पदावर कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरणार आहे. पृथ्वीराज चव्हाण, विजय​वडेट्टीवार यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभेकरिता शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी (ता.१९) पार पडले. त्यानंतर लगेच सोमवारी (ता.२०) कॉंग्रेसने विरोधी पक्षनेता निवडीसाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विखे पाटील यांनी मुलासाठी नगर लोकसभेची जागा मागितली होती. आघाडीत ती जागा राष्ट्रवादीकडे होती. ती देण्यास नकार दिल्याने सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुलाच्या प्रचारात सहभागी झाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागले. त्यांच्या जागेवर नवा नेता सोमवारी (ता.२०) निवडला जाणार आहे. आमदार विजय वडेट्टीवार विधिमंडळ उपनेते आहेत. विदर्भातील दुष्काळग्रस्त समितीचे ते अध्यक्ष आहेत. विरोधकांना अंगावर घेऊन त्यांची कोंडी करण्याची ताकदही त्यांच्यात आहे. चंद्रपूरचे आमदार बाळू धानोरकर यांना शिवसेनेतून त्यांनी कॉंग्रेसमध्ये आणले. शेवटपर्यंत संघर्ष करून लोकसभेची उमेदवारीही मिळवून दिली. त्यावरून त्यांची पक्षात ताकद वाढल्याचे दिसून येते. विदर्भाला कॉंग्रेसने कुठलेही महत्त्वाचे पद दिलेले नाही. प्रदेशाध्यक्ष मराठवाड्याचे असल्याने विरोधी पक्षनेते पद विदर्भाला देऊन प्रादेशिक समताेल साधल्या जाऊ शकतो, असेही मत कॉंग्रेस नेते व्यक्‍त करीत आहेत. त्यासोबतच संयमी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचीदेखील या पदासाठी चर्चा आहे. परंतु पक्षनेतृत्व कोणाच्या गळ्यात ही माळ टाकते हे आजच्या बैठकीअंती स्पष्ट होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT