Opposition to allotment of lands to Ring Road, Railway Project 
मुख्य बातम्या

रिंग रोड, रेल्वे प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध

रकार निर्णयावर ठाम असेल तर कृषी युवा क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्रभर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असे इशारा कृषी युवा क्रांती संघटनचे अध्यक्ष प्रसाद घेनंद यांनी दिला आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : पुणे शहरालगत होणाऱ्या रिंग रोडला व पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्पाला जमीन देण्यास सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे. तरी देखील सरकार निर्णयावर ठाम असेल तर कृषी युवा क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्रभर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असे इशारा कृषी युवा क्रांती संघटनचे अध्यक्ष प्रसाद घेनंद यांनी दिला आहे.

श्री. घेनंद म्हणाले की, प्रत्येक विकासाच्या योजनेत कायम शेतकऱ्याला ग्राह्य धरले जाते, अशी भूमिका आताचे सरकारने बदली पाहिजे. कारण मतदानाच्या वेळेस शेतकरी आणि विकास कामाच्या वेळेस का नको, शेतकरी त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन शेती आणि त्यात शेतीवर आपण विकासाची प्रोजेक्ट सांगून शेतकऱ्यांची शेतजमीन दर वाढणार असाल तर अशा विकासाच्या प्रोजेक्टला आमचा विरोध आहे. आतापर्यंत विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला फक्त वेडं बनवण्याचे काम या सर्व राजकीय व्यक्तींनी केले आहे, पण आता हे चालणार नाही.

ज्या शेतकऱ्यांचे गेली पंचवीस वर्ष ऊस कारखान्याला जात आहेत. अशा लोकांच्या जमिनी जिरायती मग बागायती कशाला म्हणतात, की पण शेतकऱ्यांना सरकारने सांगावा आणि शेतकऱ्यांचा अंत बघू नये. कारण शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर तो स्वतः पुरत पिकवेल, जेव्हा अन्नाची गरज भासेल तेव्हा शेतकऱ्यांना सरकारने आवाहन करू नये. रिंग रोड आणि रेल्वे प्रकल्पाला सर्व भागातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. हे सरकारने समजून घ्यावे. कारण शेतकऱ्याच्या हातात नांगर चांगला दिसतो मग त्यांनी कुऱ्हाड उचलल्यावर सरकारला झेपणार नाही. कृषी युवा क्रांती संघटनेच्या वतीने आम्ही सरकारला आवाहन करतो की शेतकऱ्याला ग्राह्य धरू नये पहिला त्याचा विचार करावा. अन्यथा परिणामांना सामोरे जावे, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT