९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती.
९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती.  
मुख्य बातम्या

मराठवाड्यात रब्बी पेरणी संथच; केवळ ९ टक्‍के पेरणी उरकली 

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : खरिपाचा हंगाम हातचा गेल्यानंतर आशा असलेल्या रब्बी हंगामातील पेरणीही लांबणीवर पडली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ ९ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकली होती. शिवाय काही पिकांचा पेरणीचा कालावधी हातचा गेल्याने अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होऊ शकेल का हा प्रश्‍न आहे. 

यंदाच्या रब्बी हंगामासाठी औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत मिळून रब्बीचे सरासरी ६ लाख ४ हजार ५३२ हेक्‍टर क्षेत्र आहे. ९ नोव्हेंबर अखेरपर्यंत ५५ हजार ९०१ हेक्‍टरवर ९.२५ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ४८ हजार ६८४ हेक्‍टर आहे. त्यापैकी २४५७ हेक्‍टरवर अर्थात १.६५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टर आहे. त्यापैकी ७८७८ हेक्‍टरवर, अर्थात ४.५२ टक्‍के पेरणी उरकली आहे. बीड जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ८१ हजार ४७९ हेक्‍टर आहे. त्यापैकी ४५ हजार ५६५ हेक्‍टरवर, अर्थात १६.१९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी उरकली आहे.   

तीन जिल्हे मिळून सरासरी व प्रत्यक्ष पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
पीक. सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्‍केवारी 
रब्‌बी ज्वारी. ३०२१८७ ४१४८७ १३.६९ 
गहू ९९१२६ १५८९ १.६० 
मका २९५९६ १२१८ ४.१२ 
इतर तृणधान्य २४९८. ७० २.८० 
हरभरा १६५३७७. ११४६५. ६.९३ 
इतर कडधान्य. १३०.२०. २.३० 
करडई. ३७८८ २५.२०

०.६७ 

पीकनिहाय पेरणी अपेक्षित कालावधी 

  • रब्बी ज्वारी  :  कोरडवाहू १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत, बागायती : ३१ ऑक्टोबरपर्यंत. 
  • गहू  :  नोव्हेबर २० पर्यंत, उशिरात उशिरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत. 
  • हरभरा :  कोरडवाहूसाठी ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा,  बागायती  :  ऑक्टोबरचा शेवटचा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा. 
  • करडई :  बागायती ३० ऑक्टोबर ते १५ नोव्हेबरपर्यंत. 
  • जवस :  १५ ऑक्टोबरपर्यंत. 
  • मोहरी : नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यात. 
  • बटाटे : ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा. 
  • ऊस :  सुरू : जानेवारी- फेब्रुवारी,  पूर्वहंगामी : ऑक्टोबर - नोव्हेंबर 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT